Mumbai

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा..!पहा ह्या तारखेपासून होतील शाळा..!

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा..!पहा ह्या तारखेपासून होतील शाळा..!

मुंबई राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना मुळे सर्व शाळा सध्या बंद होत्या .पहिल्या टप्प्यात काही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत आणि उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत नव्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.

राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं होईल परिवर्तन

सीएसआर फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं परिवर्तन करण्यात येईल. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि 40 नामांकित कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सीएसआर फंडातून 471 शाळांच परिवर्तन आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, इमारत आणि इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत.

15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालये सुरू होतील

येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू होऊ शकतील.कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू होतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button