sawada

सावदा फैजपूर येथील गोळ्या बिस्किट च्या नावाखाली अवैध विमल गुटखा विक्रीचा धुमाकूळ

सावदा फैजपूर येथील गोळ्या बिस्किट च्या नावाखाली अवैध विमल गुटखा विक्रीचा धुमाकूळ

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

येथील अनेक दिवसापासून चर्चेचा विषय ठरलेल्या सावदा फैजपूर सह परिसरात येथील सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स समोर शॉपिंग सेंटर मध्ये दररोज मध्यप्रदेशातून आणून लाखो रुपयांचा अवैध विमल गुटखा विक्री मुळे अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे सावदा आणि फैजपुरात आधी लाखो रुपयाचा विमल गुटक्याचे केंद्र होते आता हे केंद्र करोड रुपयाचे झाल्याने बिनधास्त विक्री सुरू असून स्थानिक पोलीस प्रशासक आणि अन्य औषध प्रशासन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांकडून आरोप होत आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जातआहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसापासून सावद्यातील वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स समोर गजबजलेल्या चौक परिसरात संबंधित एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरोसे या ठिकाणी विमल गुटखा विक्रीचा धुमाकूळ सुरू असून कितने ही तक्रारी आने दो मै सब संभालुंगा या विश्वासावर बिनधास्त विमल गुटखा विक्रीचा धुमाकूळ सुरू आहे तसेच फैजपूर च्या बहुतेक ठिकाणी गोळ्या बिस्किट आणि स्टेशनरी स्टोअरच्या नावाखाली येथे दररोज रावेर आणि यावल तालुक्यातून अवैध विमल गुटखा घेणाऱ्यांच्या अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे

येथील येथील विमल गुटखाकिंग यांनी या ठिकाणी अवैध विमल गुटखा विक्रीचा अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून सावदा तालुका रावेर तसेच फैजपूर तालुका यावल या ठिकाणी अवैध विमल गुटखा घेणाऱ्यांची अक्षरशः झुंबड उडत असते या ठिकाणी अवैध विमल गुटखा विक्रीमुळे सुज्ञ नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून जिल्हा पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button