Faijpur

बोरखेडा प्रकरणातील पीडित कुटुंबाला 1 महिना उलटूनही शासनाकडून मदत नाही फैजपूर री.पा.ई (आ)गट तसेच आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांचे प्रांत कार्यालयावर निदर्शने

बोरखेडा प्रकरणातील पीडित कुटुंबाला 1 महिना उलटूनही शासनाकडून मदत नाही फैजपूर री.पा.ई (आ)गट तसेच आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांचे प्रांत कार्यालयावर निदर्शने

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

Faizpur : 1) बोरखेडा येथे आदिवासी कुटुंबातील चौघे भाऊ-बहिनीची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. सदर घटना माणुसकीला व संपूर्ण देशाला काळीमा फासणारी असुन पिडीत कुटुंबीयाकडे १ महिना उलटूनही अदयाप पर्यंत शासनाने कोणतेही प्रकारचा मदतीचा हात दिलेला नसुन त्यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसुन येत आहे तरी पिडीत कुटुंबाला शासनाने मदत करावी या हेतुने खालील मागण्या मोऱ्यांच्या माध्यामातून करण्यात येत आहे.

१)पिडीत कुटुंब है आज रोजी मानसिक व शारीरीक तणावात जिवन जगत असून कुटूंबातील चौघ बहिण भावांची हत्या झाल्याने भयभित झाले आहेत आज रोजी सदरील कुटुंब पुर्ण पणे उध्दवस्थ झाले आहे. तरी त्याचे मनोबल वाढविण्या साठी व समाजात जीवनमान उंचविण्यासाठी सदर पिढीत कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाने त्वरीत २५ लाखापर्यंत आर्थिक मदत करावी.

2)पिडीत कुटुंबियांतिल मुलांचे शिक्षणाचा मान शासनाने उचलावा.
3)तसेच पिडीत कुडूंबाचे पुर्नवसन करून त्यांना त्यांच्या हक्काचा घरकूलाच्या माध्यामातून निवारा उपल्बध करून दयावा.

4)आज रोजी पिडीत कुटुंब हे रावेर येणे वसतीगृहात राहत अमातांना व त्यांना राहाण्यासाठी निवाऱ्याची अत्यंत गरज असतांना त्यांना खऱ्या अर्थाने सहानुभूतीची गरज असतांना उलट अरथी प्रकल्प अधिकारी सोनवणे मॅडम यांनी सदर पिडीत कुटुंबियांना वस्तीगृहात हाकलून लावले आहे. त्यांना त्यांचे कुटुंबा सहीत थंडीत रस्त्यावर आनले आहे एकप्रकारे सोनावणे मॅडम यांनी निर्दयपणाचा कळसा गाळलेला आहे. तरी सदर वस्तीगृहागे लेखापरिक्षण होवुन सोनवणे मॅडम यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.
सदरील मागण्या गेल्या महिन्या भरात मान्य न झाल्यास आंदोलन
जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात यावी याची शासनाने दखल घ्यावी
गेतृत्वकर्ने

१)मा.राजुभाऊ सुर्यवंशी रि.पा.ई.जिल्हा अध्यक्ष जळगांव.

2) मा.ईश्वर भाऊ इंगळे री.पा.ई अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जळगाव

3) मा.विक्की भाऊ तायडे री पा ई रावेर तालुका अध्यक्ष

३)मा.एकनाथभाऊ गाढे रि.पा.ई.जिल्हा उपाध्यश

५)मा.सलीमभाऊ तडवी आदी.तडवीभिल्ल एकता मंच अध्यक्ष
नासिर तडवी ,सरफराज तडवी ,शंकर बर्डे ,लखन भाऊ इंगळे ,किरण तायडे ,राजू तडवी ,नितीन बोरेकर कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button