Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज निवडणुकीत प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनल सरळ लढत , जिल्ह्यात तर्कवितर्क ना उधाण

मराठा विद्या प्रसारक समाज निवडणुकीत प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनल सरळ लढत , जिल्ह्यात तर्कवितर्क ना उधाण

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी नंतर निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून चोवीस जागा पदाधिकारी व संचालक असताना २९१ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आज माघारी नंतर २३५उमेदवारानी माघार घेतली आहे तर ५६ उमेदवार सत्ताधारी प्रगती पॅनेल व विरोधात परीवर्तन पॅनल मध्ये सरळ सरळ लढत होत आहेनाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज निवडणूक जाहीर झाली असून यात निलिमाताई पवार यांचे प्रगती पॅनल व अॅड. नितीन ठाकरे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात लढत होत असून आज पॅनल निर्मिती झाली त्यात दोन पॅनल मध्ये समोरासमोर लढत असून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.

प्रगती पॅनल (नीलिमा ताई पवार प्रणित)

अध्यक्ष- डॉ. सुनील उत्तमराव ढिकले
सभापती- माणिकराव माधवराव बोरस्ते
सरचिटणीस – नीलिमाताई वसंतराव पवार
उपाध्यक्ष- दिलीप तुकाराम मोरे
उपसभापती – डॉ. विलास केदा बच्छाव
चिटणीस – डॉ. प्रशांत पाटील

तालुका सदस्य प्रगती पॅनलचे उमेदवार

इगतपुरी-भाऊसाहेब खातळे
कळवण – धनंजय पवार
दिंडोरी -सुरेश कळमकर
नाशिक शहर – नानासाहेब महाले
बागलाण – विशाल प्रभाकर सोनवणे
निफाड – दत्तात्रय निवृत्ती गडाख
नांदगाव- चेतन मनसुखराव पाटील
चांदवड – उत्तमबाबा भालेराव
देवळा- केदाजी तानाजी आहेर
मालेगाव – डॉ. जयंत पवार
सिन्नर – हेमंत विठ्ठलराव वाजे
येवला – माणिकराव माधवराव शिंदे
नाशिक ग्रामीण- सचिन पंडितराव पिंगळे

महिला सदस्य
कापडणीस सरला गुलाबराव
आढाव सिंधुबाई मोहनराव

याप्रमाणे प्रगती पॅनलचे उमेदवार निश्चित झाले आहेत तर परिवर्तन पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे

परिवर्तन पॅनल (अॅड.नितीन ठाकरे प्रणित )
अध्यक्ष : कोकाटे माणिकराव शिवाजीराव
उपाध्यक्ष; मोरे विश्वास बापूराव
सभापती : क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ
उपसभापती : मोगल देवराम बाबुराव सरचिटणीस : अॅड. ठाकरे नितीन बाबुराव
चिटणीस : दळवी दिलीप सखाराम

महिला सदस्य:
बोरस्ते शोभा भागवत
सोनवणे शालन अरुण

तालुका सदस्य परिवर्तन पॅनलचे उमेदवार

इगतपुरी: गुळवे संदीप गोपाळराव
कळवण: देवरे रवींद्र शंकर
दिंडोरी : जाधव प्रवीण एकनाथ
नाशिक शहर: लांडगे लक्ष्मण फकीरा बागलाण: डाॅ. सोनवणे प्रसाद प्रभाकर
निफाड: गडाख शिवाजी जयराम
नांदगाव: पाटील अमित उमेश सिंग,. चांदवड : डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव
देवळा: पगार विजय पोपटराव
मालेगाव: बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ
सिन्नर: भगत कृष्णाजी गणपत
येवला : बनकर नंदकुमार बालाजी
नाशिक ग्रामीण : पिंगळे रमेश पांडुरंग

याप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली असून दोन्हीही पॅनल पॅनल तर्फे प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.

यात निलीमाताई पवार व अॅड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलमध्ये समोरासमोर लढत असून सदर निवडणूक अत्यंत चुरशीची होईल. यात चांदवड तालुक्यातून परिवर्तन पॅनल तर्फे डॉ. सयाजीराव गायकवाड व प्रगती पॅनल तर्फे उत्तम बाबा भालेराव यांच्यातच लढत होणार आहे. मागील निवडणुकीत सुद्धा या दोघांमध्येच निवडणूक लढाई झालेली होती आता या वेळेस कोण बाजी मारेल याची मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.अध्यक्षपदासाठी प्रगती पॅनेल वतीने डॉ सुनील ढिकले तर परीवर्तन पॅनल वतीने आमदार माणिकराव कोकाटे यांचे शी लढत होत आहे.सभापती पदासाठी प्रगती पॅनेल वतीने माणिकराव बोरस्ते तर परीवर्तन पॅनल वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असलेल्या निफाड तालुक्यात प्रगती पॅनेल व परीवर्तन पॅनल वतीने प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात असल्याने तुल्यबळ प्रतिस्पर्धी लढतीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button