sawada

सावद्यात अवैध झूलेलाल बायोडिझेल पंप मालकवर अखेर सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ठोस प्रहारच्या बातमीची दखल

सावद्यात अवैध झूलेलाल बायोडिझेल पंप मालकवर अखेर सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ठोस प्रहारच्या बातमीची दखल

सावदा : सावदा येथे एक नव्हे दोन अवैध बायोडिझेल पंप मात्र महसूल विभागाची अजब किमिया रावेर रोडवरील बायोडिझेल पंप मालकावर अद्याप कोणतीच कारवाई न करता घेतले अंगाशी व झुलेलाल बायोडिझेल पंप मालकवर कारवाई करून पायाशी ठेवण्याचा प्रकार असून महसूल विभागाने घेतलेली ही भूमिका संशयास्पद दिसून येते.तरी याप्रकरणी थेट आता जिल्हाधिकारी जळगांव व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज.

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील पंपू टाकून अवैधरित्या बायोडिझेल विक्रीचा गोरख धंदा करणारे झुलेलाल बायोडिझेल मलाकवर अखेर १५ दिवसानंतर सावदा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र सावदा येथे अवैधरित्या बायोडिझेल दोन पंप चालत असून फक्त झुलेलाल बायोडिझेल पंपाचे मालक वर कारवाई करून रावेर रोडवरील महेंद्र धाबा समोरील सुरू असलेले बायोडिझेल पंप मालकावर महसूल विभाग कडून आज पावेतो कोणतीही कारवाई न करण्यामागचे कारण समजण्या पलीकडचे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सावदा येथील बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा प्रकरणी रावेर तहसीलदारांची भूमिका संशयास्पद पंधरा दिवस उलटूनही पंप मालकांवर गुन्हा दाखल नाही या मथळ्याखाली ठोस परहार ने बातमी प्रसिद्ध केल्याने सावदा येथील एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे गुपित पद्धतीने अवैधरित्या भाड्याने घेतलेली जागेवर झुलेलाल बायो डिझेल व रावेर रोड वरील महिंद्रा धाबा समोर पंप टाकून बिनदिक्कतपणे बायोडिझेल विक्री करण्याचा गोरखधंदा चालविला जात होता. यासंदर्भात वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्याने बायोडिझेलचा एक पंप सील झाला.व रावेर रोडवरील दुसरा पंपावरअद्याप संबंधित यंत्रणांकडून कोणतीच कारवाई झालेली न होती. यामुळे दोन्ही पंप चालक मालक मोकाट फिरत होते.

याप्रकरणी रावेर ते जळगांव दरम्यान महसूल विभाग व दोन्ही पंप चालक यांच्यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली असावी अशी चर्चा नागरिकांमध्ये होत होती.

परिणामी आज दिनांक ६ ऑगस्ट २०२१ रोजी महसूल विभागाला उशिरा का होईना पण जाग आल्याने सावदा फैजपूर रस्त्यावरील डायमंड ट्रान्सपोर्ट च्या मागे बायोडिझेलच्या गोरखधंदा करणारे झुलेलाल पंप मालक नीरज खेमचंद जैसवाणी रा. जळगांव यांच्याविरुद्ध अतुल वाकोजी नागरगोजी पुरवठा निरीक्षक तहसीलकार्यालय रावेर यांनी दि.६ ऑगस्ट रोजी फिर्याद दिल्यानंतर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.१२०/२०२१ भादवी कलम ४२०,४०६,१८८ व जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस पोहेका. विनोद पाटील हे पुढील तपास करीत आहेआहे.

मात्र बायोडिझेलची विक्री व त्याचा शिल्लक साठा, सदर बायोडिझेल रॉकेल मिश्रित तर नाही ना म्हणून त्याचे नमुने सॅम्पल तपासणी होणे गरजेचे आहे. कारण की राज्यात रॉकेल बंदी मात्र रॉकेल मिश्रित बायोडीजल विक्रीचा प्रकार रावेर येथे उघडकीस आलेला आहे.या पंप चालकांना बायोडिझेलचा पुरवठा कोण व कसा करीत होता. झुलेलाल बायोडिझेल पंप भाड्याची जागा घेऊन गुप्त पद्धतीने चालत होता ती जागा कोणाची? या दिशेने पुढील तपास पोलिसांकडून झाल्यास यात आरोपी संख्या मध्ये निश्चित वाढ होतील हे मात्र खरे आहे. तसेच याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button