Nashik

दिंडोरी तालुक्यातील गोळशी टोलनाक्यावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा जप्त

दिंडोरी तालुक्यातील गोळशी टोलनाक्यावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा जप्त

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : दिंडोरी नाशिक पेठ धरमपुर मार्गावरील गोळशी टोलनाक्यावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा वाहतुक शाखेच्या भरारी पथकाने पकडला असून दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक दिनेश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कैलास देशमुख, पोलिस नाईक सागर सौदागर पोलिस कॉस्टेंबल दत्तू शिंदे, रूपेश कांबळे,चालक शिंपी यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

बेकायदेशीर रित्या पिक अप क्र.एम एच -१५ एच एच १०८७ नाशिक कडे येत असतांना गोळशी फाट्यावर वाहतूक शाखेच्या पथकाने गाडी थांबवून तपासणी केली असता विमल गुटखा गोण्या मिळून आल्या वाहनासह २१ लाख ८० हजार ९२० रू मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन चालक मुझेद्दिम शेख याला अधिक चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button