Dharangaw

इंदिरा गांधी विद्यालयात भारतीय पोस्ट बँकेची जनजागृती

इंदिरा गांधी विद्यालयात भारतीय पोस्ट बँकेची जनजागृतीकिरण चव्हाणधरणगाव-(दि.-14) इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे भारतीय पोस्ट बँकेची जनजागृती करण्यात आली
दैनंदिन जीवनात व्यवहार करत असताना आपल्याला नेहमी बँकेच्या भल्या मोठ्या रांगेत उभे रहावे लागते तासनतास उभे राहून देखील व्यवहारात अनेक अडचणी निर्माण होतात, बचत खाते उघडताना पाच ते सात दिवस वाट बघावी लागते अश्या वेळेस खूप त्रास होतो हा त्रास दूर करण्यासाठी व लोकांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी भारतीय पोस्ट खात्याने पोस्ट बँकेची निर्मिती केली आहे त्याची जनजागृती करण्यासाठी जळगाव येथील पोस्टाचे अधिकारी गोपाळ पाटील विद्यालयात आले होते.अतिशीग्र बचत खाते फक्त चार मिनिटात शंभर रुपये बचत ठेवून उघडता येते ही या बँकेची खासियत आहे,नेट बँकिंग चे सर्व व्यवहार अनेक प्रकारचे रिचार्ज, व वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपल्याला खरेदी करता येऊ शकते, आपले बचतीचे खाते दुसऱ्या बँकेचे असले तरीहीआपल्याला दहा हजार रुपये आधार कार्ड च्या माध्यमातून या बँकेत त्वरीत मिळू शकतात यासह अनेक प्रकारचे समज-गैरसमज या बाबी पाटील यांनी सविस्तर पणे माडल्यात
विद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव सी के पाटील यांनी गोपाळ पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.इंदिरा गांधी विद्यालयात भारतीय पोस्ट बँकेची जनजागृतीकार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन डी एन पाटील यांनी केले तर आभार ए एस पाटील यांनी मानलेत
कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन डी जी पाटील,व सचिव सी के पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button