Mumbai

वेळ आली तर राज्यात पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वेळ आली तर राज्यात पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची गंभीरपणे चर्चा सुरू आहे.वेळ प्रसंगी खंबीर पावले उचलावी लागतील त्यामुळे नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्याची माहिती मिळाली आहे.आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली.आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील कोविड संदर्भात मंत्रिमंडळाला माहिती दिली. राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचाही आढावा घेण्यात आला.टास्क फोर्सने केलेल्या सूचना विचारात घेऊन चर्चा करण्यात आली.

मागील आठवडाभरात केरळ मध्ये जवळपास दिड लाख रुग्ण आढळून आले होते. पुढील दीड ते दोन महिने महत्त्वाचे असल्याचे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तो लावावेच लागेल असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button