Paranda

घराचा पत्रा फाडून विज घरात घुसली घरातील टीव्ही सह इतर साहित्य जळून खाक

घराचा पत्रा फाडून विज घरात घुसली
घरातील टीव्ही सह इतर साहित्य जळून खाक

सुरेश बागडे परंडा

परंडा : परंडा तालूक्यातील खासगावचे शेतकरी मधुकर सुदाम जगदाळे यांच्या घराचा पत्रा फाडून विज घरात घुसल्याने घरातील टीव्ही चा स्फोट होऊन , मिक्सर कपाट , इतर साहित्याचे नुकसान झाले ही घटना दि .२ ऑक्टोबर रोजी रात्री ९- ३० वाजेच्या सुमारास घडली .

या घटने मुळे शेतकरी जगदाळे कुटूंबाचा थरकाप उडाला घरातील विद्यूत उपकरणा सह वायरींग बोर्ड सर्व जळून खाक झाल्याने शेतकरी कुटूंबाला काळोख्यात रात्र जागुन काढावी लागणी .

मधुकर जगदाळे , हे पत्नी सुवर्णा मुलगा अजय व त्यांच्या घराच्या शेजारील धनाजी शिंदे यांचा दिड वर्षाच्या नातवा सह झोपले होते रात्री ९ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली आणी कडकडती विज घराचा पत्रा फाडून घरात शिरली या मुळे घराची पडझड झाली तर घरातील , टीव्ही , मीक्सर जळून खाक झाले तर कपाटाच्या काचा फुटून घरात काचेचा खच पडला घराचा पत्रा फाडून विज घरात शिरली तर भिंत चीरून निघून गेली .

या घटनेची माहिती मिळाल्याने बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी खासगाव येथे भेट देऊन पाहणी केली व शेतकरी मधुकर जगदाळे यांना तात्काळ ५ लाख रुपयाची आर्थीक मदत देन्यात यावी अशी मागणी केली
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे
नसीम पटेल , कानिफनाथ सरपने , भीमराव जाधव , फुलचंद ओव्हाळ , सचिन गायकवाड , रामा भोसले , विनायक होरे, उपस्थित होते .

घरावर विज पडल्याची माहिती मिळाल्याने राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अँड सुभाष वेताळ , गोविंद जाधव यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यास आर्थीक मदत मिळऊन देन्यासाठी मंत्रलय स्तरावर प्रयत्न करू असे यावेळी सांगीतले यावेळी ग्राम पंचायत सदस्य भारत थाटे , धर्मा जगदाळे , बबन दत्तू लिककर , पंडीत जगदाळे , पोलिस पाटील विठ्ठल सातपूते , धनाजी शिंदे ,आदिंची उपस्थिती होती .
घटना स्थळाचा महसुल विभागाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button