Pandharpur

मोहोळ तालुक्यातील काही भागातील रस्ते दुरूस्ती करण्याची शिवबुध्द संघटनेची मागणी ÷सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे

मोहोळ तालुक्यातील काही भागातील रस्ते दुरूस्ती करण्याची शिवबुध्द संघटनेची मागणी ÷सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे

प्रतिनिधी रफिक आत्तार

मोहोळ तालुक्यातील काही भागातील रस्ते दुरूस्ती करावेत,कारण मोहोळ तालुक्यातील काही भागातील रस्ते नीट नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी, महिला माता भगिनी आणि शेतकरी,आणि जनसामान्य नागरिकांनाच्या आरोग्य धोक्यात आले आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या शाळेत जाताना या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले आहेत.ज्या भागातील गावांचे रस्ते नीट नसलेले गावे,मिरी ,येणकी,वटवटे,इंचगाव,अरबळी,या ठिकाणाचे रस्ते अतिशय खराब झाले आहे,रस्ते खराब होण्याचे कारण अवैध वाळू वाहतुक केल्यामुळे या भागांतील रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, मोहोळ तालुक्यातील मिरी या गावातून भिमा नदीच्या पात्रातून वाळूमाफिया रात्रीदिवसा ट्रॅक्टर, ट्रक,पोकलेन मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असल्यामुळे रस्ताची बिकट अवस्था झाली आहे,मोहोळ तालुक्यातील त्याभागातून ऊस कारखान्यावर नेताना शेतक-यांना त्या रस्त्यावर तारेची कसरत करावी लागत आहे.

तरी सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांनी भागांतील रस्ते लवकरात लवकर दुरूस्ती करावे आणि या भागांतील नागरिकांच्या समस्या सोडव्यात,जिल्हाधिकारी साहेबांनी या सर्व गोष्टी लक्ष केंद्रित करावे असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देतांना शिवबुध्दचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे,गणेश पवार ,लखन साळी,शैलेश चवरे, समाधान चवरे,हनुमंत डोलारे, महिबुब पठाण, विकास सावंत, सोहेल सय्यद, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button