Chopda

अडावद आरोग्य केंद्रात ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ वडगांव बु. येथे सर्वेक्षण करतांना.. आरोग्य सेवक-विजय देशमुख व आशा सेविका-वैशाली पाटिल

अडावद आरोग्य केंद्रात ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ वडगांव बु. येथे सर्वेक्षण करतांना.. आरोग्य सेवक-विजय देशमुख व आशा सेविका-वैशाली पाटिल

चोपडा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली..
“विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा” कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये, आरोग्य कर्मचारी तथा आशा सेविकांच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे.

‘अर्भक मृत्यूदर’ व ‘बाल मृत्यूदर’ चे प्रमाण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने ५ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागिल ‘अतिसार’ हेच प्रमुख कारण आसून,
१०% बालके या अतिसारमुळे दरवर्षी दगावतात आणि ह्या बालमृत्यूचे प्रमाण हे मुख्यतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असते.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्य करणे, हे उदिष्ट समोर ठेवून,
राज्यभरात दिनांक-१५जुलै ते ३० जुलै २०२१ या कालावधीत,
“विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा” आम्ही राबविण्याचे ठरविले असल्याचे.. अडावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णुप्रसाद दायमा, व डॉ.अर्चना पाटिल यांनी सांगितले.

आज वडगांव बु येथे ‘अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ या कार्यक्रमांतर्गत,
आरोग्य कर्मचारी तथा आशा सेविका ह्या घरोघरी जाऊन ५ वर्षापर्यंतच्या बालकांचे सर्वेक्षण करून, त्यांना अतिसारमुळे होणारे नुकसान, तसेच वारंवार हात धुणे, स्वच्छतेचे नियम व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून-गार करून पिणे, इत्यादी विषयी मार्गदर्शन व माहिती नागरिकांना सर्वेक्षणादरम्यान दिल्या जात आहेत,
तसेच ORS, झिंक च्या गोळ्या देखील देण्यात येत आहेत.

प्रसंगी.. आरोग्य सहाय्यक-प्रकाश पारधी, यांच्या पर्यवेक्षणाखाली.. आरोग्य सेवक-विजय देशमुख, आशा सेविका-वैशाली पाटिल, अनिता निळे हे भागात सर्वेक्षण करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button