Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र.. आरोग्यास गुणकारी मध

आरोग्याचा मुलमंत्र..आरोग्यास गुणकारी मध

भूक वाढविण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधामुळे अनेक शारीरिक फायदे होतात. साखरेला पर्याय म्हणून गुळ किंवा मध पाहिलं जातं. दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते.
त्यामुळे मध खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. खरुज किंवा अन्य त्वचेसंबंधित तक्रारी असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून ते पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावं.

२. डोळ्यांशी निगडीत तक्रारी असल्यास गाजराचा रस आणि मध एकत्र करुन त्याचं सेवन करावं.

३.मधाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

४. अनेक जणांना भूक न लागण्याी समस्या असते. अशा व्यक्तींनी मधाचं सेवन करावं. मधामुळे भूक वाढते.

५. मधामुळे पचनशक्ती वाढते.

रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

६. मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.

७. टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.

८. मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.

९. मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

१०. कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.

११. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.

१२. रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.

म्हणूनच बहुगुणी मधा च सेवन रोज कराव.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button