India

आरोग्याचा मुलमंत्र…गुळ खाण्याचे आरोग्यास फायदे

आरोग्याचा मुलमंत्र…गुळ खाण्याचे आरोग्यास फायदे

गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असल्यास घराघरांत गुळाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.
प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ६, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारख्या कित्येक पोषक घटकांचा गुळामध्ये खजिना आहे. विशेष म्हणजे यामध्ये फॅट्स अजिबात नाहीत. यामुळे फिट राहण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देखील देतात. सविस्तर जाणून घेऊया गूळ खाण्याचे फायदे…

१. गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.

२. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी – पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अँसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.

३. सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.

४. थकवा दूर होतो – गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.

५. गूळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.

६. गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

७. हाडं मजबूत होतात – गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथीक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button