Faijpur

फैजपूर बसस्थानक जवळील गटार उघड्यावर आरोग्यास धोका

फैजपूर बसस्थानक जवळील गटार उघड्यावर आरोग्यास धोका

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

येथील गेल्या आठ दिवसापासून बस स्थानक जवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे बस्तानका मागील मिरची ग्राउंड कॉलनी मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती त्यामुळे या ठिकाणी पाईपलाईन चोकअप काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या गटारी उघड्यावर पडली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरात मनमानी कारभार सुरू आहे पिण्याच्या पाईपलाईनचे काम झाले परंतु गटार उघड्यावर पडली असून बसस्थानक मधून येणाऱ्या एसटी बसचा मार्गच बंद झालेला असून एकाच मार्गाने महामंडळाच्या बसेस ये जा करीत आहे त्यामुळे एसटी बस सह प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे गेल्या आठ दिवसापासून उघड्यावर पडलेले गटारीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे तसेच एसटी बस स्थानकात येण्या जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे नगरपरिषदेच्या अशा गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहे या गटारीची त्वरित दुरुस्ती करावी आणि नागरिकांना होणारा त्रास त्वरित मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button