India

Health..कॅल्शियम ची योग्य मात्र व अतिसेवनाचे नुकसान

Health..कॅल्शियम ची योग्य मात्र व अतिसेवनाचे नुकसान

शरीरानुरुप कॅल्शियमची गरज वेगवेगळी असते, वयानुरुप ती बदलत जाते. कॅल्शियमची नेमकी गरज किती व केव्हा असते आणि कॅल्शियमच्या अति सेवनाने होणारे दुष्परिणाम, समजून घेणे महत्त्वाचे आहे…

कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे जे आपली हाडे, दात आणि स्नायू मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास स्नायू आणि सांधे कडक होणे, दात दुखणे, त्वचा कोरडी होणे, नखे कमजोर होणे, तुटणे अशा समस्यांना त्रास होऊ लागतो.

एका तरुण व्यक्तीला दररोज सुमारे १००० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. १००० mg पेक्षा जास्त कॅल्शियमचे सेवन शरीरासाठी जास्त असते. तरुण प्रौढांसाठी २००० mg जास्त आहे.जेव्हा कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. हात-पाय आणि चेहऱ्याभोवतीच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवणे, हाडे कमकुवत होणे आणि वारंवार फ्रॅक्चर होणे.

आता आपण अतिरिक्त कॅल्शियम सेवना मुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेऊ.

1) किडनीच्या समस्या वाढू शकतात:
कॅल्शियमचे जास्त सेवन केल्याने किडनीच्या समस्या वाढू शकतात. हाडे हवे तितके कॅल्शियम शोषून घेतात आणि उरलेले कॅल्शियम किडनीपर्यंत पोहोचते आणि किडनी लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या होऊ.

2) कॅल्शियमचे जास्त सेवन पचन बिघडवू शकते :
जर एखाद्या व्यक्तीने दररोज एक हजार मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शियमचे सेवन केले तर त्याची पचनक्रिया बिघडू लागते. एखाद्या व्यक्तीला पोट फुगणे, पोट खराब होणे आणि बद्धकोष्ठतेची तक्रार असते. पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या देखील वाढू लागते. कॅल्शियमच्या अतिसेवनामुळे व्यक्तीमध्ये मळमळ आणि उलटीची समस्या वाढते.

3) पुरुषांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो:
जर एखाद्या पुरुषाने जास्त कॅल्शियम घेतले तर त्याला प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. २००७ मध्ये, अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या अहवालात असे सुचवण्यात आले की कॅल्शियमचे जास्त सेवन केल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो.

• अधिक कॅल्शियम आणखी काही दुष्परिणाम :
कॅल्शियमच्या अति प्रमाणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात, त्यामुळे त्याचा ओव्हरडोस न घेण्याचा सल्ला दिला जातो. स्नायू दुखणे हा शरीरात कॅल्शियमचे प्रमाण अधिक झाल्याचे लक्षण आहे. तसेच त्यामुळे तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा, थकवा यांना सामोरे जावे लागते. काही लोकांना खूप काळ डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. बद्धकोष्ठता होण्यास देखील कॅल्शियम कारणीभूत ठरते.

कॅल्शियम जितके महत्वाचे तितकेच घातक. म्हणून कॅल्शिअम चा डोस घेण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथीक तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button