?अमळनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत बदल्या..कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष.. आर्थिक उलाढालची शक्यता..!
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आज विविध विभागांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.यासंदर्भात कर्मचारी असंतुष्ट असल्याची चर्चा आहे. आज दि 4 नोव्हेंबर रोजी नगरपरिषदेने काढलेल्या आदेशानुसार 20 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.यामागे मोठी आर्थिक षडयंत्र असल्याची चर्चा देखील आहे.या बदल्यांमागे आर्थिक उलाढाल असल्याचे बोलले जात आहे.
अमळनेर नगरपालिकेत बर्याचश्या कर्मचाऱ्यांच्या विविध विभागात नगरपालिका प्रशासनाने आज दि 4/11/2020रोजी बदली आदेश काढले या बाबत नगरपालिका कर्मचार्यांची भावनिकदृष्टीने विचारपूस केली असता असे निदर्शनास आले की या बदल्या डोळ्यात तेल टाकून केलेल्या आहेत असे नाराजीचे सूर उमटत आहेत असे समजते.
यातील एक विशेष बाब म्हणजे नगरपरिषदेच्या दवाखान्यातील औषध निर्माता म्हणून लेखी आदेश असलेले दोन कर्मचारी हे दरमहा शासनाचे वेतन घेत आहेत आणि तेच दोन कर्मचारी अमळनेर नगरपरिषदेत लिपिक चे कार्य करत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.नियमानुसार त्यांनी शासनाच्या आदेशानुसार दवाखान्यात कार्यरत असणे आवश्यक आहे परंतु आर्थिक फायद्यासाठी सदर दोन्ही व्यक्ती लिपिक म्हणून काम करत आहेत. ही शासनाची फसवणूक असल्याची चर्चा केली जात आहे.आता यावर कर्मचारी काय पाऊल उचलतात हे पाहणे देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.








