India

Health: लघवीचा रंग बदलला..? त्वरित डॉ ना संपर्क साधा..!

Health: लघवीचा रंग बदलला..? त्वरित डॉ ना संपर्क साधा..!

शरीरातील अवयव योग्यरित्या कार्य करत आहे की नाही, याबाबत अनेकदा आपले शरीर संकेत देत असते. डॉक्टर जिभेचा बदलता रंग, अथवा लघवीच्या रंगामधून आपला आजार ओळखण्याचा प्रयत्न करतात. लघवीच्या बदलत्या रंगानुसार आपल्या शरीरात काय गडबड सुरु आहे याची माहिती मिळते. किडनी, मधुमेह, युरिन इन्फेक्शन या गंभीर आजाराच्या निगडीत माहिती देखील लघवीच्या तपासणीतून मिळते. असे बरेच लोक असतील, ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी पॅथॉलॉजिकल युरिन टेस्ट केली असेल. यामध्ये लघवीची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी करून रोग शोधला जातो.

डॉ.च्या म्हणण्यानुसार, ”सामान्यत: लघवीचा रंग हलका पिवळा असतो, पण जर तुम्हाला त्यात काही बदल दिसत असेल तर, लगेच डॉक्टरांना दाखवा. त्याबद्दल सांगा कारण, ही बाब आरोग्याच्या समस्या दर्शवते”

फिकट पिवळा
हलक्या पिवळ्या रंगाची लघवी सामान्य आहे. हा रंग दर्शवतो की, तुमची तब्येत निरोगी आहे. व तुम्ही स्वतःला चांगले हायड्रेट ठेवत आहात. उत्तम आरोग्यासाठी ही सवय जपा. वेळेवर पाणी पीत रहा.

पिवळा रंग

लघवीचा रंग पिवळा असेल तर, याचा अर्थ आपण पुरेसे पाणी पीत नाही. शरीरात जास्त घाम येणे किंवा कमी हायड्रेशनमुळे लघवीचा रंग पिवळा होतो. ही समस्या कमी करण्यासाठी अधिक प्रमाणावर पाणी प्या. तरी देखील रंगामध्ये बदल घडत नसेल तर, डॉक्टरांशी संपर्क साधा.

गडद पिवळसर रंग/नारंगी रंग

लघवीतील नारंगी रंग बर्‍याचदा काही औषधांच्या सेवनामुळे, किंवा नैसर्गिक लिंबूवर्गीय फळांच्या सेवनामुळे होतो. हा रंग शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे दर्शवते. अशा परिस्थितीत जंक फूडऐवजी सकस आहाराचे सेवन करा, व पुरेसे पाणी पीत राहा. यासोबतच अशी फळे खा ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. पण तरीही जर लघवीचा रंग केशरी दिसत असेल तर, लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button