लोण बु येथील हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त.. मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
अमळनेर लोण खु. येथे गावठी दारूच्या भट्टीवर मारवड पोलिसांनी कारवाई केली. सदर भट्टी उध्वस्त केली असून यात ४०० लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असून एका महिलेविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि जयेश खलाणे यांना लोण खु. येथे एका महिलेकडे दारूचे कच्चे रसायन असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पो.ना. भटूसिंग तोमार, पो.ना. सुनील तेली, भरत गायकवाड, कॉ. नेहा बरेला या पथकाने लोण खु. येथे गावठाण जागेत झाडाझुडपात धाड टाकली असता छायाबाई किशोर भील या गावठी दारू तयार करण्यासाठीचे साहित्य बाळगून होती पण या महिलेला पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेली.
सदर ठिकाणाहून पोलिसांनी १२ हजार रुपये किमतीचे ४०० लिटर कच्चे रसायन जप्त केले. उर्वरित साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.सदर महिलेविरुद्ध मु. प्रो. अँक्ट ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. भटूसिंग तोमार करीत आहे.






