India

Health : आरोग्यदाई झेंडू.. मासिक पाळीतील वेदना करतो कमी…

Health : आरोग्यदाई झेंडू.. मासिक पाळीतील वेदना करतो कमी…

आपल्या भारतीय संस्कृतीत काही विशिष्ट सणांना झेंडूच्या फुलांचे तोरण लावण्याची पद्धत आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीत त्याचे महत्त्व आहे. कदाचित त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून त्याचा सणावाराला वापर करण्याची प्रथा रूढ झाली असावी. मग जाणून घेऊया झेंडूच्या फुलांचे काही आरोग्यदायी फायदे.

• मासिक पाळी च्या वेदना कमी करते

झंडू च्या फुलाचे मदर टिंचर घेऊन ते पाण्यात 10 थेंब टाकून घ्यावे . आराम मिळतो. अर्थात होमिओपॅथीक तज्ञाचा परमार्श घ्यावा.

• जखमेवर लवकर भरण्यास उपयुक्त –

झेंडूची फुले वाटून त्यात तूप, हळद घालून कोमट करा. सहन होईल इतपत कोमट झाल्यावर हे मिश्रण जखमेवर बांधा. त्यामुळे जखमेची ठणक कमी होते. तसेच जखम सुकून बरी होते.

• सूज आणि मुका मारावर उपयुक्त –

सूज किंवा मुक्कामार लागल्यावर झेंडूची पाने स्वच्छ धुवून वाटून ते गरम करा. हा लेप ज्याठिकाणी जखम किंवा सूज आली आहे, अशा ठिकाणी लावा. यामुळे सूज उतरण्यास मदत होते.

• पोटाच्या इन्फेकशनपासून सुटका –

झेंडूच्या फुलाचा अर्क असलेले पाणी प्यायल्याने पोटाचे इन्फेकशन दूर होण्यास मदत होते. त्यात असलेल्या अँटी इन्फ्लाममेटरी गुणधर्मांमुळे पोट दुखीवर आराम मिळतो.

• तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी गुणकारी –

दातांवर साचणाऱ्या बॅक्टरीयामुळे दात खराब होतात. त्यामुळे हिरड्यांचे विकार उद्भवतात. परंतु, यावर झेंडूचे फुल परिणामकारक ठरते.

• केसांसाठी वरदान

झेंडूचे फूल केसांची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी तर मदत करतेच, पण केस मजबूत करून केसगळती रोखण्यासाठीही खूप प्रभावी आहे. झेंडूच्या फुलाच्या मदतीने केसगळती रोखण्यासाठी आठवड्यातून एकदा मास्क म्हणून वापरा. हे केस मजबूत करणारा मास्क बनवण्यासाठी:-

8-10 झेंडूची फुले, 5-6 झेंडूची पाने आणि दोन हिबिस्कस फुले धुवून स्वच्छ करा.
झेंडूची फुले, पाने आणि हिबिस्कसची फुले मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा.
त्यात 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि 1 टीस्पून मेंदी पावडर घालून चांगले मिक्स करा.
हा पॅक केसांना नीट लावा आणि अर्ध्या तासानंतर धुवा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button