? खेदजनक:- कत्तली साठी ३४ गोवंश घेऊन जाणारा कंटेनर पकडण्यात आला…! फैजपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
ठळक मुद्दे
गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी
गुप्त माहितीवरून पोलिसांनी पकडले कंटेनर
कंटेनर मध्ये आढळलेली २ गाई व ३२ बैल पैकी बरेच गोवंश मरण पावले
कोविड १९ व लॉक डाऊन नियमांची पायमल्ली
युसूफ शाह सावदा
सावदा : जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यात फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले फैजपुर _ खिरोदा रस्त्यावर अतिशय निर्दयपणे कत्तलीसाठी गोवंश कोंबून घेऊन जाणारा एका कंटेनरला गुप्त माहितीच्या आधारावर फैजपुर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असून गोवंशाची तस्करी करणार्यांचे धाबे दणाणले असून या पकडलेल्या कंटेनरमधे मोठ्या प्रमाणात आढळलेले पशुधन मृत्यू अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फैजपुर_ खिरोदा दरम्यान एक कंटेनर जात असून त्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याची गोपनीय माहिती फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना मध्यरात्री मिळाली. असता फैजपूर पोलिसांच्या पथकाने फैजपूर ते खिरोदा दरम्यान सापळा रचला. सदर रस्त्यावर उत्तर प्रदेश पासिंगचा एक कंटेनर येत असताना त्यास पोलिसांनी अडवला असता कंटेनरात ३२ बैल आणी २ गायी असे एकुण ३४ गुरे आढळून आली. त्यातील बहुतेक गुरे मरण पावली असल्याचा अंदाज त्यावेळी येत होता. मध्यरात्रीची वेळ असल्याने व उशीर झाल्यामुळे ते कंटेनर गोवंशासह जळगाव – कुसुंबा येथील गोशाळेत रवाना करण्यात आले ही माहिती समजल्याने येथील गोशाळेचे कामकाज पाहणारे वाल्मिक पवार यांनी आपल्या सहका-यांना रात्रीच कामावर हजर राहण्यास बजावले. मात्र रात्रीचे दोन – अडीच वाजले असतांना आलेल्या कंटेनर मधून गुरे काढण्यापुर्वीच परिसरात उग्र दर्प येण्यास सुरुवात झाली. कंटेनर उघडून पाहिले असता त्यातील ३२ बैल आणि २ गायी अशी एकुण ३४ गुरे मरण पावली होती या गुरांना उतरवण्याचे काम सकाळपर्यंत स्थगित करण्यात आले. सकाळी गोशाळेचे सर्व कर्मचारी पुन्हा कामाला लागले. परिणामी त्यांनी या मेलेले गुरांचा दफनविधी केला.
या गंभीर प्रकरणी फैजपुर पोलिस स्टेशनला आज दुपारपर्यंत फक्त कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते. याप्रकरणी पोलिस नाईक उमेश चौधरी यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात फिर्यादीनुसार *कंटेनर चालक मुन्नेखान प्यारेलाल (इस्लामनगर ओरीया उत्तर प्रदेश)* याच्याविरुद्ध गु.र.न.६६/२१ नुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. ३४ गुरे सह कंटेनर असा एकुण १६ लाख ७२ हजार किंमतीचा मुद्देमाल सुध्दा जप्त करण्यात आला आहे
*कोरोना काळात लाकडाऊनचे नियम मोडून बाजार बंदी असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश कंटेनर मध्ये कुठे जात होते? याचा बोलवता धनी कोण? या दिशेने पोलिसांनी तत्परता दाखवून अधिक सखोल तपास लावून त्या गोवंश तस्करांवर हि कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करणे गरजेचे आहे*






