Nashik

सुरज मांढरे यांच्याकडून गंगाथरन डी, यांनी स्वीकारला नाशिक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सुरज मांढरे यांच्याकडून गंगाथरन डी, यांनी स्वीकारला नाशिक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक=शासन आदेशानुसार आज डॅशिंग IAS अधिकारी डी. गंगाधरन यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारताच नाशिक जिल्ह्यातील वाळू माफिया व गौण खनिज माफियांनी धसका घेतल्याचे समजते. मावळते जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची पुणे येथे राज्याच्या शिक्षण आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, विद्वान असे प्रभावी व्यक्तिमत्त्व व गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख असलेले डी. गंगाधरन नाशिक जिल्ह्याला लाभल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे तर दुसरीकडे वाळू माफिया, अवैध गौण खनिज माफिया व अवैध व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहे. आज जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांच्याकडून नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्य दालनात स्विकारला. पदभार स्वीकारण्याची व सोपवण्याची प्रशासकीय प्रक्रिया यावेळी पार पडली. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे ,निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे ,जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, नितीन कूमार मुंडावरे, गणेश मिसाळ भीमराज दराडे, नितीन गावडे, निलेश श्रिंगी, ज्योती कावरे ,प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत पवार, राजेंद्र नजन, व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button