Amalner

तुरटीचा गणपती न प त उपलब्ध..!पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा..!प्रशासनाचे आवाहन…!

तुरटीचा गणपती न प त उपलब्ध..!पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा..!प्रशासनाचे आवाहन…!

अमळनेर :- प्रदूषण टाळण्यासाठी, महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय क्रमांक – अभियान २०२०/प्र.क्र.१३४/ता.क्र-०१ दिनांक १४ ऑक्टोबर २०२० च्या परिपत्रकानुसार “माझी वसुंधरा अभियान २.०” अंतर्गत, “जल” तत्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण यांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी नगरपरिषद तसेच सर्व नागरिकांची असल्या कारणे अमळनेर नगर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अमळनेर नगपरिषद हद्दीत गणेशोत्सवात सर्वत्र गणेश मुर्तींची स्थापना होणार असून बाजारात विविध प्रकारच्या गणेश मूर्तींची विक्री होणार आहे. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती तसेच विविध रासायनिक रंग दिलेल्या मूर्तींचा समावेश असणार आहे. तरी सदर विसर्जनाच्या दिवशी पर्यावरणाला घातक असलेल्या मुर्तींचे विहिरी, नदी, नाले, बंधारे तसेच धरणातील पाणी इत्यादी ठिकाणी विसर्जन केल्यामुळे मूर्ती या बऱ्याच काळ त्या ठिकाणी अस्ताव्यस्त अवस्थेत पडून राहतात व त्या ठिकाणी पाण्याचे प्रदूषण होते. तथापी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अमळनेर नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या संकल्पनेतून तुरटी (अॅंलम) पासून बनविलेल्या गणेश मूर्ती “ना नफा, ना तोटा” या तत्वावर अमळनेर नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अमळनेर नगरपरिषद हद्दीतील गणेशोत्सव स्थापन करणारे मंडळानी व नागरिकांनी अधिक माहितीकरिता अमळनेर नगरपरिषदेशी संपर्क साधावा. (शहर अभियान व्यवस्थापक, चंद्रकांत मुसळे, भ्रमणध्वनी क्र – ८२०८६३४५०९). कळावे.
“अमळनेर शहर स्वच्छ सुंदर” व “जल प्रदूषण मुक्त शहर”
वजन किंमत वजन किंमत
१.१ किलो २५१/- ५.९ किलो १३०१/-
२.५ किलो ३५१/- ९.२ किलो १५०१/-
२.८ किलो ४०१/- २५ + किलो ४००१/-
३.९ किलो ७०१/-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button