Amalner

एसटी संप…एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस (दिशाभूल) वेतनवाढ परंतु भविष्य अंधकारमय म्हणून विलिनीकरणावर ठाम

एसटी कर्मचाऱ्यांना भरगोस (दिशाभूल) वेतनवाढ परंतु भविष्य अंधकारमय म्हणून विलिनीकरणावर ठाम

एसटीचे विलिनीकरण व्हावे यासाठी गेले तीन आठवडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे परंतु या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळवेतनात 5000-4000-2500 अशी वेतनवाढ देऊन आकडे फुगवून दाखविलेमुळे जनतेच्या मनात एसटी कर्मचारीविषयी कुठेतरी आक्रोश निर्माण केलाय पन त्यामागील सत्य जाणून घ्या..

एसटीमहामंडळात एसटी कर्मचारी वेतनासाठी दर चार वर्षानी करारपध्दत लागु आहे आणि शरद पवारांची निगडीत असलेली संघटना मान्यताप्राप्त असल्याने प्रत्येकवेळी शरद पवार यांनी मध्यस्थी केलेशिवाय हा करार झालेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात खुप मोठी तफावत आहे..आणि याला फक्त शरद पवार जबाबदार आहेत दिनांक 22-11-2021 रोजी सरकार 150 कोटीपर्यतची वेतनवाढ देण्यास सकारात्मक होते परंतु शरद पवारांनी परिवहनमंत्री आनिल परबसो यांची भेट घेऊन परत कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला आणि ही वेतनवाढ 50 कोटीपर्यत आणली.

एसटी कर्मचाऱ्यांचा मागील 2016-2020 चा करार अजुन प्रलंबीत आहे 2020-2024 कराराचा अजुन मसुदाच सादर नाही आणि ही वेतनवाढ देतांना 50 कोटीचा बोजा सरकार घेणार आसे सांगितले आहे म्हणजे ही वेतनवाढ घेतांना भविष्यात वेतनवाढ मिळणार नाही याचे संकेत दिले आहे.

आज तुमच्या घरात जर एखादा शासकीय कर्मचारी असेल तर त्याला त्याचे मुळवेतन विचारा , त्याचा वार्षिक वेतनवाढिचा दर विचारा त्याप्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना मुळवेतन मिळत नाही वार्षिक वेतनवाढ देखील जो शासकीय कर्मचाऱ्यांना 3% मिळतो तो एसटी कर्मचाऱ्यांना 2% दिला जात आहे.. हि वेतनवाढ देतांना 2016-2020 व 2020-2024 या कराराबाबत कोणतेही भाष्य मंत्रीनी केलेले नाही त्यामुळे ही वेतनवाढ कर्मचाऱ्यांना परवडणारी नाही शेवटी आम्हालाही कुंटुंब आहे ,संसार आहे ,दवाखाना आहे याचाही विचार करावा लागेल.

आज आमजनतेला जो त्रास होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत पन एसटीचे अस्तित्व टिकवणेसाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही नाहीतर एसटी तोट्याच कारण देऊन हे एसटी महामंडळ बंद करतील चांगल्या बसेस नाहीत ETIM मशिन नाहीत म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनाविषयी चुकीची भावना मनात आणू नका तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत फक्त थोडेदिवस आम्हाला साथ द्या हि विनंती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button