Amalner

युवा उद्योजक आणि DS24 जिम चे संचालक धीरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

युवा उद्योजक आणि DS24 जिम चे संचालक धीरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

अमळनेर शहरातील युवा उद्योजक व DS 24 जिमचे संचालक धिरज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त भव्य असे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वाघ यांचा हस्ते करण्यात आले. सदर शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या,पत्रकार प्रा जयश्री दाभाडे, सचिन भाऊ खंडारे ,हिरालाल पाटील,उमेश वाल्हे,महेंद्र महाजन,देवा भाऊ लांडगे,ईश्वर देशमुख,माधवराव पाटील,लोटन पाटील,अमोल परदेशी इ उपस्थित होते.

शिबिरामध्ये डॉ. तुषार परदेशी (MD medicine) व डॉ.श्रध्दा चौटे (BHMS) यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 200 व्यक्तीनी आरोग्य तपासणी केली.
आरोग्य शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी शुभम पाटील,मयुर चौधरी,भुषण चौधरी,शुभम चौधरी,सौरभ पाटील,भैय्यु पाटील,ऋषिकेश पाटील,हेमदीप चौधरी,तेजस पाटीलविनित मराठे,गोलू पाटील , मिलिंद पाटील इ नी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button