kalamb

डिकसळ येथील चोरी प्रकरणी चार आरोपी अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

डिकसळ येथील चोरी प्रकरणी चार आरोपी अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सलमान मुल्ला कळंब

कळंब : तालुक्यातील डिकसळ येथील शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप मेटे यांचे सागर बिअर बार याच आरोपींनी फोडून लाखो रुपयांचे विविध देशी, विदेशी मद्य पळविले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गुप्त माहिती आधारे कळंब तालुक्यातील इटकुर परिसरातून चार आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार दुपारी कारवाई करण्यात आली. दरम्यान ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींकडून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.

हे फरार आरोपी इटकुर परिसरात असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने, अमोल चव्हाण, भुजबळ, ठाकूर, काझी, सय्यद, सर्जे आदींनी कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button