Chopda

अमळनेर पाठोपाठ चोपड्याची स्मशानभूमी पुन्हा तापली मृतांना सरणही मिळेनासे झाले, सरण अभावाने मृतदेह जळत आहेत अर्धवट

अमळनेर पाठोपाठ चोपड्याची स्मशानभूमी पुन्हा तापली मृतांना सरणही मिळेनासे झाले, सरण अभावाने मृतदेह जळत आहेत अर्धवट

योगेश पवार चोपडा

चोपडा : शहर आणि तालुक्यात कोरोना मुळे पॉझिटिव येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, मृत्यूचे तांडव मात्र थांबता थांबत नाहीये. मृत्यूचे तांडव थांबत नसल्याने दिनांक २६ रोजी सात ते आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या पैकी सहा मृतदेहांना अग्नी देण्यात आला होता. म्हणून जवळपास महिनाभरानंतर चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक शाळेच्या पाठीमागे असलेली स्मशान भूमी पुन्हा तापली आहे. उपजिल्हा रुग्णालयात दिनांक २६ रोजी तीन रुग्णांचे मृत्यू झाले होते.तर शहारात काही रुग्णांचा मृत्यू झाला होता.तर दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू इतर आजारपणाने किंवा नैसर्गिक मृत्यू झालेला होता. असे एकत्रित दिनांक २६ रोजी मृतदेहांची संख्या दहा ते अकरा एवढी झाली होती. गेल्या महिन्यात एकेका दिवशी दहा ते पंधरा कोरोना मुळे मृत व्यक्तींना स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी आणले जायचे त्यानंतर धर्तीवर दिनांक २६ रोजी स्मशानभूमीमध्ये जवळपास सात ते आठ मृतदेह अंतिम संस्कारासाठी आणलेले होते आणि त्या व्यतिरिक्त उपजिल्हा रुग्णालयात दोन ते तीन मृतदेह वेटिंग वर होते तर स्मशानभूमीत दोन रुग्णवाहिकेत दोन मृतदेह वेटिंगवर होते. मृतांना शेवटच्या क्षणी ही त्यांच्या शरीराची अवहेलना होत आहे. एवढेच नाही तर अनेकांचे मृतदेह अपूर्ण सरणामुळे अर्धवट जळत आहेत. कोरोनाने मृत रुग्णांचा अंतिम प्रवास ही सुरळीत होत नसून मृतदेहाची अवहेलना होत आहे. दररोज दोन ते तीन मृतदेह अंतिम संस्कार साठी येत असल्याने व दोन महिन्यापासून मृत्यूचे तांडव सुरू असल्याने सरणाची कतरता निर्माण झाली आहे. मात्र ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे.त्यांनी ही व्यवस्था पुरेपूर उपलब्ध करावी जेणेकरून सोशल मीडियावर अर्धवट जळालेले मृतदेह फोटो व्हायरल होणार नाहीत.किंवा अंतिम संस्कारासाठी आलेल्या लोकांनी अर्धवट जळालेले मृतदेह पाहून भावना भडकणार नाही यासाठी स्मशान भूमीत लागणारी सर्व व्यवस्था पुरेपूर असणे गरजेचे आहे. आणि नगरपालिकेतील संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांनी ही यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दिनांक २६ रोजी अंत्ययात्रा साठी जमलेल्या लोकांनी व त्यातल्या शिवसेनेचे नगरसेवक महेश पवार आणि सेनेचे शहर प्रमुख आबा देशमुख यांनी याबाबत नगरपालिका प्रशासनावर संताप व्यक्त करीत भोंगळ कारभार सुरू असल्याचे जमलेल्या लोकांच्या निदर्शनात आणून दिले आहे व सदर अर्धवट जळालेले मृतदेहावर तक्रार केल्यानंतर दुसऱ्या प्रेतासाठी रचण्यात आलेल्या सरणावरून दोन ते तीन लाकडे टाकण्यात आले.हे सर्वसामान्य नागरिकांना संताप निर्माण करणारा प्रसंग आहे.

प्रतिक्रिया
१ जीवन चौधरी गटनेते नगापलिका चोपडा,
स्मशान भूमीत लाकडे संपली आहेत का असे गतनेते जीवन चौधरी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काल पर्यंत लाकूड साठा भरपूर होता आणि आहे असे सांगितले.
२ आबा देशमुख, सेना शहर प्रमुख चोपडा
याबाबत प्रत्यक्ष दर्शी घटनेचे वृत्त पाहून शिवसेना शहर प्रमुख आबा देशमुख यांनी नगरपालिकेच्या भोंगळ कारभार सुरू असल्याचे सांगितले. तसेच कामे करायचे नसतील तर खुर्च्या खाली करा. लाज वाटायला पाहिजे अश्या शब्दात पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.प्रेताची शेवटच्या वेळी ही थट्टा नगरपालिका करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फोटो: स्मशान भूमीत अर्धवट जळालेला मृतदेह दिसत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button