Nashik

“नाईक महाविद्यालयात पर्यावरण पर्यावरण दिन साजरा”

“नाईक महाविद्यालयात पर्यावरण पर्यावरण दिन साजरा”

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयात “जागतिक पर्यावरण दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालय परिसरात पिंपळाचे, वडाचे तसेच गुलाब व जास्वंदी या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षरोपण कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नाना चव्हाण तसेच श्री प्रकाश सांगळे श्रीमती प्रतिभा सांगळे उपस्थित होते. वृक्षरोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कर्मचारी दीपक इप्पर, रवींद्र गवळी, राहुल काळे, योगेश बोडके, मोबीन सैय्यद व प्रियंका वडजे यांनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button