Pune

डोण सडकेचीवाडी, कापरवाडी येथील जि प. शाळेत येथे शैक्षणिक साहित्य वाटप

डोण सडकेचीवाडी, कापरवाडी येथील जि प. शाळेत येथे शैक्षणिक साहित्य वाटप

मंचर : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोण सडकेचीवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोण कापरवाडी तसेच अंगणवाडी यांना माननीय श्री . दत्तात्रय केंगले साहेब व माननीय सौ संगीता दत्तात्रय केंगले यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू विकत घेण्यासाठी खूप अडचणी येत असतात आणि शिक्षणामध्ये अडचण येऊ शकते त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते हे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी माननीय श्री . दत्तात्रय केंगले साहेब इन्कम टॅक्स ऑफिसर पुणे यांच्या माध्यमातून दोन्ही शाळेंना व अंगणवाड्यांना विविध शैक्षणिक साहित्य देऊन एक मदतीचा हात दिला आहे .यापूर्वी अनेक शाळांना त्यांनी शैक्षणिक कामसंदर्भामध्ये मदत केलेली आहे .तसेच विविध गावातील ग्रंथालयांना पुस्तके , कपाट भेट दिली आहेत . तसेच संगणक , ई -लर्निग , टॅब भेट दिले आहेत .त्यांचे या कामाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती डोण तसेच शिक्षक वृंद यांनी आभार मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button