Faijpur

उद्योजक नरेश काळे यांचा ” खान्देश भूषण ” पुरस्काराने विशेष गौरव वैश्विक स्थरावर कार्याची चुणूक दाखविल्याबद्दल झाला सन्मान..!

उद्योजक नरेश काळे यांचा ” खान्देश भूषण ” पुरस्काराने विशेष गौरव
वैश्विक स्थरावर कार्याची चुणूक दाखविल्याबद्दल झाला सन्मान..!

फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

– खान्देशातील विविध क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ” खान्देश भूषण पुरस्कार ” देऊन काल गौरविण्यात आले.
हा देखणा सोहळा प्रसिद्ध हॉटेल कमल पॅरेडाईज येथील सभागृहात पार पडला. यात नरेश काळे यांचा सन्मान करण्यात आला. ‘ गोलमाल , सिंघम , ऑल द बेस्ट , धम्माल ,दहा बाय दहा , नवरा माझा नवसाचा फेम सुप्रसिद्ध सिने अभिनेते विजय पाटकर ( मुंबई ) यांच्या शुभहस्ते नरेश प्रदीप काळे (मुंबई ) यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रगतिशील शेतकरी टेनू बोरोले ,डॉ.संभाजीराजे पाटील ,डॉ.महेंद्र काबरा ,प्रीतम मुनोत ,ऍड.महेंद्र चौधरी, डॉ.अतुल भारंबे,सामाजिक कार्यकर्ते उमाकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव ,धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील २८ जणांना गौरविण्यात आले. खान्देश भूषण पुरस्कार सोहळा सप्तरंग इव्हेंटस तर्फे पार पडला.
*नरेश काळे यांच्याबद्दल*…

समाजातील काही व्यक्ती या आपल्या कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाची चुणूक दाखवत असतात. अशाच आपल्या विशेष कार्याने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्र व वैश्विक स्तरावर लक्षणीय काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नरेश प्रदीप काळे होय.ते मूळचे तरसोद येथील आहेत.

नरेश काळे यांनी मुंबई युनिव्हर्सिटी येथून इंजीनियरिंग केलं आहे. शिक्षणानंतर तात्काळ त्यांना बीजी शिर्के कंपनी सारख्या नामवंत कंपनीत संधी मिळाली आणि त्यांच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नरेश काळे यांनी अल्ट्राटेक, एल अँड टी, एसीसी, एचसीसी, गोदरेज यांसारख्या अनेक नामवंत कंपन्यांमध्ये आपल्या कामाने प्रभाव टाकला आहे.
नरेश काळे यांनी मुंबई मेट्रो लाईन क्रमांक तीन, त्यासोबतच मुंबई नरिमन पॉईंट ते वरळी हा कोस्टल रोड प्रोजेक्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या शासकीय प्रकल्पांमध्ये देखील आपले अत्यंत मोलाचे असे योगदान दिले आहे. विशेष बाब अशी की, नरेश काळे हे सध्या जगातील क्रमांक दोनचा आणि भारतातील क्रमांक एकचा अश्या नवशेवा शिवडी या जगातील सर्वात लांब पुलाचे काम समर्थपणे पाहत आहेत.

आपल्या व्यावसायिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रात देखील नरेश काळे यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय असे आहे. युवा शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, त्यांना आर्थिक सहाय्य, नव्या संशोधनासाठी साधनसामुग्री, मुंबई महानगरपालिके अंतर्गत हंगरी फ्री मुंबई या उपक्रमात 16 शाळांसाठी दुपारच्या जेवणात सकस आहार, शालेय बालकांसाठी दप्तर, पुस्तक, रेनकोट, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या दीडशेपेक्षा जास्त लोकांच्या रोजगारांसोबतच इतर जीवनावश्यक सुविधांसाठी मदत करणे यातून त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे.

राजस्थानमधील पथमेधा या जगातील सर्वात मोठ्या गोशाळेला देखील ते आपल्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरवत असतात. त्यांच्या या विशेष अश्या व्यावसायिक आणि सेवा कार्याबद्दल त्यांना ” खान्देश भूषण पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात गायिका अबोली कार्लेकर ,गायत्री नाटेकर ,मयूरकुमार यांनी काही गाणीही सादर केलीत.
आशुतोष पंड्या , पंकज कासार ,गिरीश नारखेडे यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कलावंत तुषार वाघुळदे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button