Ahamdanagar

पाडळीच्या दोन आडमुठ्या शेतकऱ्यामुळे हनुमानटाकळी ते पाडळी हा डांबरी रस्ता गटारगंगेत बुडाला

पाडळीच्या दोन आडमुठ्या शेतकऱ्यामुळे हनुमानटाकळी ते पाडळी हा डांबरी रस्ता गटारगंगेत बुडाला

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीर्थक्षेत्र हनुमान टाकळी ते पाडळी या रस्त्यावर बावणेवस्ती ते म्हसोबा मंदिर या ४०० मिटर अंतराचा दप्तरी संपूर्ण डांबरीकरण झालेला रस्ता आज पुर्ण पणे गटारगंगेत बुडाला आहे. पाडळी येथील दोन शेतकरी कचरेबंधूच्या रस्ता विरोधी धोरणामुळे हा रस्ता अपूर्णच राहिला आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून हनुमान टाकळी,पाडळीचे ग्रामस्थ २०१६ पासून पाथर्डीचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम खाते,जिल्हाधिकारी अहमदनगर, यांना निवेदने देऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.पाथर्डीचे नवनियुक्त तहसीलदार शाम वाडेकर यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तहसीलदार यांना दि.१२/१०/२०२० रोजी पुन्हा एकदा निवेदन दिले आहे.रस्ता दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा ईशारा दिलेल्या निवेदनात संबंधित अधिकारी यांना देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी सरपंच कुशिनाथ बर्डे, अशोक सुराशे,अण्णासाहेब दगडखैर, बाळासाहेब बर्डे, चेरमन अशोकराव काजळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button