Pandharpur

श्री पांडुरंग परिवाराचे विद्यमान सर्वेसर्वा चेअरमन मा श्री प्रशांतजी परिचारक सर .पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि श्रीपुर.आमदार विधनपरिषद महाराष्ट्र राज्य..यांना आम आदमी सचिव नागेश पवार यांचा शेतकरी यांच्या संदर्भातील या पत्राद्वारे सवाल .

श्री पांडुरंग परिवाराचे विद्यमान सर्वेसर्वा चेअरमन मा श्री प्रशांतजी परिचारक सर .पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि श्रीपुर.आमदार विधनपरिषद महाराष्ट्र राज्य..यांना आम आदमी सचिव नागेश पवार यांचा शेतकरी यांच्या संदर्भातील या पत्राद्वारे सवाल .

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आमदार व चेअरमन साहेब आपण विधानपरिषदेत नदीकाठचे पुरग्रस्थ शेतकरी यांच्या पिकाच्या नुकसानभरपाई बाबत बोलला.असो ते आपले कर्तव्य आहे. परंतु आपल्या कारखाण्याने जि नदीकाठच्या पूरग्रस्त ऊस शेतकरी जे आपले सभासद म्हणुन आपल्या कारखाण्याला ऊस पाठवित असतात दि 2020 ते 2021 या साला करिता जो ऊस पाठविला व तो पूरग्रस्त होता असा ऊस आपण गाळप केला .या पूरग्रस्त ऊसाच्या बिलातुन आपन जसे मिळेल तसे 300रु ते 400रु काही टना मागे पूरग्रस्त असे म्हणुन बिल कापले असेलते कोणाच्या परवाणगीने?आणि मग जर आपण पूरग्रस्त ऊस म्हणुन जर याच वर्षी रक्कमा कट केल्या तर या मागिल अनेक वर्षे पुर आले ऊस पूरामध्ये सापडले मग आपण त्यावेळी का रक्कमा कट केल्या नाहीत?आणि कोरोणाच्या काळातच जणतेच्या आडचणीतच आपण बिल कट करुन आणखी आडचण निर्माण केली असे आपल्याला वाटते का? आणि मग असे वाटले तर मग याचे कारण येणारी पोटनिवडणुक याचा खर्च हे असु शकते का? जर टना मागे ऐवढी रक्कम कट करत असाल तर आपण या रक्कमेमागे कसा हिशोब केला?जर शासणानेच पूरग्रस्त शेतकरी यांना हेक्टरी 12000 ची मद्दत केली असेल आणि ती शेतकरी यांच्या खातेत जमा नसेल तर तुम्ही कोणाच्या परवाणगीने ही कपात केली? आणि तुम्ही शेतकरीयांच्या नुकसानभरपाई आजतागायत मिळाली नाही याबाबत विधापरिषदेत भांडला का? नसाल तर आपली लोकप्रतिनिधी म्हणून नैतिकता काय?आणि आपण सारखेच निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून भाग घेता आणि पोटनिवडणुकीमध्ये पण आपण उमेदवार असाल तर याबाबत आपले हेतु,धोरणे काय? आणि मग जर अशी चुकीची धोरणे असतील तर मग आपण लोकहितासाठी लोकंची बाजु मांडण्यासाठी विधानसभा व विधानपरिषदेमध्ये आलो नाही तर आपल्या संस्थांन मार्फत शेतकरी कामकरी कष्टकरी गरिब जणता यांच्या खिशावर डल्ला मारण्यासाठी व या सर्व काळ्या कृतीला राजकीय पाठबळ मिळेविण्यासाठी आलोत असे तुम्हाला वाटते का? आपण टना मागे 300रु ते 400रु कपात करत असाल तर शेतकरी यांना शासनाने नुकसानभरपाई दिलेली रक्कम व शेतकरी यांची ऊस बिलाची रक्कम याच्या दोन तीन पट रक्कम आपणच गिळंकृत केली का आणि कशासाठी? आपल्याला सर्व गणित जमतात मग हे डल्ला मारु गणित कसे जमले आणि यामागे जिल्ह्यातील आणखी डल्ला मारु नेते आपल्या पाठीशी उभे आहेत का?आणि पुन्हा आपण आपल्या कारभाराची टिमकी ऊस सभासदांमध्ये मिरवणार का? मग आपण शेतकरी यांच्या रक्कमा कोणतेही इंटीमेश न देता का काढल्या? आणि सदर बिलावरती बाॅलपेनने पूरग्रस्तांच्या रक्कमा का लिहल्या? कोणत्या साखर आयुक्त व मंत्रालयाने तुम्हाला परवानगी दिली याचा आपण खुलासा करणार का?आणि आपल्याला असे वटले का की आपला सभासद आपण अर्थीक जुलुम जरी केला तरी तो भ्रशब्द काढणार नाही आपल्या विरोधात बोलणार नाही आणि बोलला तर आपण त्याला चिरडून टाकु? जर परवानगीच दिली नसेलही मग तुम्ही असे अनैतिक कृत्य का केले?आणि जर केले तर प्रयश्चीत काय करणार?आणि आपण या रक्कमा परत देणार का?आणि कधी देणार?मग तुम्हाला सर्वच निवडणुकांमध्ये नागरिकांनी का निवडुन द्यावे?या पत्राद्वारे मिडीया मार्फत मि व सुज्ञ शेतकरी आपल्या कडे येत आहो.या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी मि व माझी सुज्ञ जणता अगदी अतुर आहे. आणि आपण खुलासेवार पुराव्यानिशी सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत आशी मि नम्रपणे आशा व्यक्त करत

आम आदमी . सचिव नागेश पवार.THIS IS MY CONSTITUTIONAL RIGHT.महोदय जनतेसमोर खुली चर्चा करण्यस आम्ही तयार आहोत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button