Amalner

Amalner: अर्थपूर्ण खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीस जिल्हा प्रशासनाने दिला “हिरवा कंदील”..!

खान्देश शिक्षण मंडळाची त्रैवार्षिक निवडणुक घेणेस जिल्हा प्रशासनाने परवानगी

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून अटी शर्तींच्या अधीन राहून निवडणूक प्रक्रिया करण्याचे आदेश मा जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक ही सर्व “अर्थाने” “अर्थपूर्ण” असते. आमदार खासदार च्या निवडणुकीत होत नाही एव्हढा गाजावाजा,आरोप प्रत्यारोप आणि आर्थिक उलाढाल ह्या निवडणुकीत होते.सध्या ही निवडणुक घेण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. पण आता जिल्हाधिकारी यांनी दि 13 फेब्रुवारी पासून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या संस्थेच्या 5786 सभासद अमळनेर तालुका/शहर तसेच जळगांव, धुळे, नाशिक, नंदुरबार, पुणे, मुंबई, औरंगाबाद,अमरावती अशा गावातुन मतदानासाठी येणार असुन आपल्या संस्थेच्या निवडणुकीस परवानगी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत अटी शर्तींच्या अधीन राहून देण्यात आली आहे.
कोविड-19 विषाणुच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता अद्यापही कोविड बाधित रुग्ण आढळुन येत असल्याने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत असल्याने सदर खान्देश शिक्षण मंडळाची त्रैवार्षिक निवडणुकीचे ठिकाणी कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने काय
उपाययोजना केली असल्याचे आश्वासन मंडळाकडून देण्यात आले आहे.

सदयस्थितीत जळगाव जिल्हयात Active cases संख्या कमी होत आहे व Positivity Percentage उतरत्या स्थितीत आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्हयातील कोविड-19 या विषाणुचा ओमिक्रॉन या नविन प्रकाराचा विषाणुचा संसर्ग/प्रादुर्भावाबाबतची सदयस्थिती विचारात घेऊन खान्देश शिक्षण मंडळाची दिनांक 20/01/2022 रोजीच्या स्थितीपासुनच्या पुढील टप्प्याच्या निवडणुक प्रक्रीया दि.13/02/2022 पासुन राबविणेस कोरोना विषयी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करुन खालील प्रमाणे नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहुन
परवानगी देणेत येत आहे.

नियम…

1) सभासद मतदारांपैकी ज्यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत किंवा RTPCR चाचणी अहवाल 48 तासापुर्वी निगेटिव आलेला आहे यांनाच मतदानांसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

2) सर्व मतदान कर्मचारी यांना RTPCR चाचणी करणे अनिवार्य असुन ज्यांचा RTPCR चाचणी अहवाल 48 तासापुर्वी निगेटिव्ह आहे त्यांनाच मतदान केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

3) सर्व सदस्य /मतदार यांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले असलेबाबतचे लसीकरणाचे प्रमाणपत्र व RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याबाबतचा अहवाल उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग अमळनेर यांचेकडे सादर करणे अनिवार्य राहील.

4) सदर संस्थेचे अंदाजित 5786 मतदार असल्याने निवडणुक प्रक्रियेत मोठया प्रमाणात एकाच केद्रावर गर्दी होऊन कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव /संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने सदर ठिकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीकोनातुन प्रत्येकी 600 पेक्षा कमी मतदार संख्येनिहाय 10 मतदान केंद्र
तयार करणेत यावेत.

5) सदर खान्देश शिक्षण मंडळाचे त्रैवार्षिक सभेच्या निवडणुकीच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यात यावी.

6) सदर निवडणुकी दरम्यान प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सीमीटर याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली राहील.

7) सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक करण्यात यावे.

8) निवडणुक मतमोजणीनंतर कुठलीही मिरवणुक काढता येणार नाही तसेच गर्दी जमवता येणार नाही.

9) शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

10) कोरोना या विषाणुच्या तिस-या लाटेचा प्रभाव पाहता गर्दी होऊन रोगाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

11) या कार्यालयाचे संदर्भिय आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

12) सदर अटी, शर्तीचे उल्लंघन झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आयोजकांची राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button