Chandwad

लोकनेते मा.आ.स्व. जयचंदजी दिपचंदजी कासलीवाल यांच्या स्मृती-दिन निमित्त दिव्यांग आदिवासी कन्येस व्हीलचेअरचे वितरण

लोकनेते मा.आ.स्व. जयचंदजी दिपचंदजी कासलीवाल यांच्या स्मृती-दिन निमित्त दिव्यांग आदिवासी कन्येस व्हीलचेअरचे वितरण

उदय वायकोळे चांदवड

आज माजी आमदार स्व. जयचंदजी दिपचंदजी कासलीवाल यांच्या स्मृतीदिना निमित्त रेणुकादेवी येथिल दिव्यांग आदिवासी कन्या कु. प्रियांका चिंतामण सोनवणे ( इ. ४ थी / जि.प. प्राथ. शाळा रेणुकानगर , देवीहट्टी चांदवड ) या बालीकेस चांदवड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष मा. श्री. भुषण भैय्या कासलीवाल यांच्या हस्ते व्हीलचेअर देण्यात आली. कै.जयचंदजी कासलीवाल यांनी आपल्या कार्यकाळात आदिवासी व समाज कल्याण च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी खूप परिश्रम घेतले मुलांनी शिकावं जनतेत सामाजिक कार्यात आपले नाव लौकिक करावं असा दृष्टीकोन समोर ठेऊन त्यांनी 1 ली 10 पर्यन्त शैक्षणिक संस्था चालू करून आज हजारो विदयार्थी शिकत आहेत.
हाच दूरदृष्टीकोण समोर ठेऊन सदर कार्यक्रम आज करण्यात आला. या प्रसंगी भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाडवी , युवा मोर्चा जि. चिटणीस श्री अंकुर कासलीवाल , ओबीसी शहराध्यक्ष महेश बो-हाडे , न्हनावे सरपंच कैलास गुंजाळ , किशोर क्षत्रिय , विशाल ललवाणी , तुषार झारोळे , मुन्ना मोरे , सुभाष मोरे , बाळासाहेब जाधव , राजाभाऊ गांगुर्डे , निलेश चौधरी , गोसावी गुरूजी , व आदिवासी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button