Nanded

पाळा येथे शालेय पोषण आहाराचे वाटप

पाळा येथे शालेय पोषण आहाराचे वाटप

नांदेड प्रतिनिधी (वैभव घाटे)

मुखेड तालुक्यातील पाळा येथे केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत कोरोना संसर्गजन्य रोग वाढत असल्याने शासनाने संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्ये लागु केल्याने शासकीय आदेशानुसार दिनांक ११ एप्रिल रोजी शाळेतील वर्ग १ ते वर्ग ७ पर्यंत च्या विध्यार्थ्याना शालेयस्तरावर शिल्लक असलेले शालेय पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, चना,वटाना,व इतर कडधान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ राव कोंडेवाड,उपअध्यक्ष विठ्ठलराव कांबळे,व्यवस्थापन समितीचे सदस्य मोती पाशा पाळेकर,पिरसाहेब पटेल,बालाजीराव गोलमल्लु,सौ.बेबीताई ईबितदार,संजयराव कांबळे,व शाळेचे मुख्याध्यापक श्री टोके पी.आर,श्री ढगे पी.जी,श्री बरगे जी. डी,श्री शिनगारे आर.एस,श्री येवतीकर एस.बी, श्री बोडके पी.के पालक विध्यार्थी उपस्थित होते.यावेळी देशावर आलेल्या कोरोना संकटाचे भान ठेऊन (सोशल डिस्टन्सिंग)ऐक मीटरचे आंतर ठेवण्यात आले होते.विद्यार्थी व पालक शिस्तीमध्ये धान्य घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button