Pandharpur

राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीची सरचिटणीस रशीद भाई शेख यांच्याकडून मास्क वाटप संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीची सरचिटणीस रशीद भाई शेख यांच्याकडून मास्क वाटप संपन्न

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस रशीद शेख यांचे कडून शहरातून विना मास्क फिरणाऱ्या तरुणांना मास्कचे वाटप करण्यात आले.
सध्या शहरातून अनेकजण विनामास्क फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असून प्रशासन आता विनामास्क फिरणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करीत कारवाई करीत आहे.अशातच मास्क वापरणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे हे सांगत प्रत्येक नागरिकांनी विना मास्क घराबाहेर पडू नये असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रशिद शेख यांनी केले.यावेळी सोलापूर पोलीस ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांचे उपस्थितीत अर्बन बँक येथे मास्कचे वाटप करण्यात आले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button