Pandharpur

दिगवंत आ.भारत नाना भालके यांच्या पुण्यतिथी निमित्त गरजू व निराधार महिलांना ब्लॅंकेट वाटप आयोजन

दिगवंत आ.भारत नाना भालके यांच्या पुण्यतिथी निमित्त गरजू व निराधार महिलांना ब्लॅंकेट वाटप आयोजन

प्रतिनिधी
रफिक आतार

दिगवंत आमदार भारत भालके यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त डॉ.सौ. प्रणितीताई भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते ढवळस गावातील गरजू महिला,निराधार महिला, कोरोना महामारी मध्ये मयत झालेल्या कुटुंबियांना 100 ब्लॅंकेटसचे वाटप करण्यात आले.कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा
प्रथम प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आहे आणि गावातील कोरोना काळात मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या नंतर डॉ.सौ.प्रणितीताई भगीरथ भालके यांचा स्वागतपर सत्कार सौ.राधिका हेंबाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रणितीताई भालके बोलताना म्हणाल्या की, ढवळस येथे नानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नानांच्या रक्ष्याबंधण कार्यक्रमाची आठवण झाली.
भारत नानांचे एक म्हणणे असायचे की मी आज जिथे आहे ना ते केवळ माझ्या जनतेच्या आशीर्वादामुळे आज एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा तीन वेळा आमदार झाला.
काहीतरी केलं हे केवळ मायमाऊलींच्या आशीर्वादामुळे ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे मी इथे पोहोचालो आहे आणि त्यांच्या या प्रेमातून मी कधी उतराई होऊ शकत नाही हे त्यांचं म्हणणं असायचं
माझ्या कडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून मंगळवेढा-पंढरपुर तालुक्यातील मायमाऊलींना रक्ष्याबंधनाचे औचित्त साधून एक साडी-चोळी देण्याचे काम करायचे.
आज ढवळसकरांच्या या प्रयत्नामुळे नानांची आठवण झाली खरं तर नानांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी अजूनही नाना आपल्यातून गेले असे वाटत नाही.आणि ही वेळ आपल्यावर येईल हे पण वाटलं न्हवूत कारण घराचं जेवढं नुकसान झालं त्याही पेक्षा आपल्या दोन्ही तालुक्याला नानांसारख्या नेतृत्वाची गरज होती.
प्रत्येक गोरगरिबांपर्यंत पोहचून आमदारचं खर काम काय असते हे आपल्याला नानांनी दाखून दिले. नानांच्या जाण्याने दोन तालुक्यात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम तुम्ही नानांनी कमवुन ठेवलेली संपत्ती ती तुमचीच संपत्ती आहे.सोन्यासारखी माणसे नानांनी आम्हाला कमवून ठेवलेली आहेत.आणि तुमच्या आशीर्वादाचा जिवावर आज आम्ही लढण्याचा प्रयत्न करत आहे.
आणि नानांना जेवढा आशीर्वाद प्रेम तुम्ही दिलं तितकाच आशीर्वाद तुम्ही भगीरथ दादां असो किंवा आमच्या कुटुंबातील कोणीही जो पुढे येऊन तुमच्यासाठी नानांच्या विचारांचा जो वसा वारसा आहे.
जो तो पुढे न्हेऊन काम करायचे आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे तो आशीर्वाद तुम्ही आमच्या पाठीवर ठेवावा एवढीच मी विनंती करते आणि नानाची उणीव आपल्याला भरून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची साथीची गरज आहे.आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन हे करायच आहे.तुमच्या कसल्याही अडी अडचणी असूद्या नाना जेवढ्या ताकतीने सोडवत होते तेव्हढ्याच ताकतीने आम्ही पण सोडवू असा मी तुम्हाला शब्द देते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button