Rawer

पुनर्वसन पुरी गावांतील गटारीच्या कामाचा दर्जा हलक्या प्रतीचा, गावकऱ्यांनी केली तक्रार विकास कामे प्रलंबित…

पुनर्वसन पुरी गावांतील गटारीच्या कामाचा दर्जा हलक्या प्रतीचा, गावकऱ्यांनी केली तक्रार विकास कामे प्रलंबित…

ता.रावेर .विलास ताठे

पुरी गावांच्या पुनर्वसनासाठी
गेली पाच वर्षे पूर्ण झाली असली तरी या गावातील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे गावातील संपूर्ण गटारी चे सांडपाणी वाहून हे ह्या मोठ्या गटारीत येवून पुढीलप्रमाणे सांडपाणी ची समस्या दूर करण्यासाठी पुनर्वसन पुरी गावांच्या विकासासाठी मोठी गटार बांधकाम करणाऱ्या ठेकेदार यांच्या कडून कामात कमालीचा ढिसूळपणा दिसून येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,या गटारीच्या बांधकाम वापरण्यात येणारी वाळू हि चक्क माती समान आहे तसेच हेच काम गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, दहा वर्षे जुनें आहे, तरी ह्या कामात गती अजून ही मिळाली नाही, तसेच कामाचा दर्जा हलक्या प्रतीचा व निकृष्ट प्रतिचा आहे असून ह्या गटारची खोली ही व्यवस्थित नाही यामुळे या गटारीतील सांड पाणी गावा बाहेर न जाता लोकांच्याच दारातच येईल. सदर संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष जाणीव पूर्वक या कामात होत आहे, अशी तक्रार पुरी गावांतील माजी सरपंच अशोक पाटील, उपसरपंच लखन धनगर, सुनिल पाटील, रविंद्र कोळी,सुलाबाई कोळी, संजय पाटील,उखा पाटील, सोपान पाटील सह अनेक नागरिकांनी केली आहे.

तरी याविषयीची दाखल संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी न घेतल्यास याविषयी आंदोलन करण्याची भूमिका गावकऱ्यांनी स्पष्ट केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button