Nashik

दिंडोरीकरंजी महंत शिवदास महाराज यांचा षोडशी विधी संपन्न:-

दिंडोरीकरंजी महंत शिवदास महाराज यांचा षोडशी विधी संपन्न:-

साधु महंताची उपस्थिती ,अनेकांना अश्रु अनावर

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र कंरजी कर्दमाश्रम ( दत्त महाराजांचे आजोळ ) चे ठाणापती ब्रम्हलीन महंत शिवदासजी महाराज यांचा षोडशी विधी अनेक साधु , महंत ,पुरोहित व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत वैदिक पध्दतीने पार पडला.
महाराजांच्या निर्वाणानंतर पंधरा दिवस भजन ,भागवत कथा, नामवंत किर्तनकारांची किर्तने आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय दादा पाटील यांनी दिली.
प्रारंभी महाराष्ट्र पुरोहित महासंघाचे शांताराम भाणसे, मधुकर जोशी यांनी शिवदास महाराज यांच्या समाधी स्थळांची संन्यासी आखाड्यांच्या वैदिक पध्दतीने विविध मंत्रोच्चार उचारून महापुजा केली. त्यानंतर एक हजार गुरूमंत्राची आहुती महाराजांना समाधी स्थळी अर्पण करण्यात आली. यावेळी हजारो भक्तांच्या जयजयकारांने कंरजी परिसर दुमदुमदुमून गेला होता.
याप्रसंगी कुंभ नगरी त्र्यंबकेश्वर येथून समस्त आखाडा परिषद व त्र्यंबक मंडल व श्री आखिल व श्री आखिल भारतीय पंच दशमान जुना आखाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीश्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, सचिव अजयपुरीजी ,सुखदेवगिरीजी, विष्णुगिरी वैजापूर,गणेशगिरी निफाड , प.पु.शारदा देवी, पोहेगाव आश्रम, भागवताचार्य मनिषादिदी निवाणेकर, आदी सह संत महंत उपस्थित होते.
वैदिक मंत्राचा जयघोषात महाराजांचा रूद्र अभिषेक पुजन, माल्यार्पण, वस्त्र,गंध, अक्षदा, पुष्पांजली याने समस्त साधु संतांच्या उपस्थितीत व मंदिर समिती विश्वस्त तसेच भक्तगण यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी महामंडलेश्वर सर्व मठाचे मठाधिपती,संत, महंत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच करंजी आश्रमातील नित्य नियमाने पूजा करण्यासाठी पुजारी हरिकेश राहतेकर यांची मानधनावर नेमणूक करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट च्या वतीने घेण्यात आला.व पुजारी हरिकेश राहतेकर यांचाही ट्रस्ट च्या वतीने शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फक्त षोडशी सोहळा संपन्न

ब्रम्हलीन महंत शिवदासजी महाराज यांचे षोडशी विधी अनेक साधु महंत पुरोहितांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आलेल्या साधु महंत,ब्राह्मण वृंद मंदिर समितीकडून शाल ,श्रीफळ,दक्षणा हार देऊन सत्कार करण्यात आला. सर्व साधु महंत हे फक्त महाराजांच्या षोडशी विधी साठी आले होते. महंत शिवदास गिरी महाराज हे कोणत्याही आखाड्याशी संबंधित नव्हते.त्यामुळे आखाड्यातील कुणाचीही मठापती म्हणून नेमणूक करण्याचा प्रश्नच येत नाही विष्णूगिरी महाराज यांना सदर सोहळ्याचे कुणीही आमंत्रण दिलेले नव्हते व त्यांचा कोणताही चादर सोहळा झालेला नाही. कुणाचीही मठाधिपती म्हणून निवड झालेली नाही. तरी कुणी भाविक भक्तांनी गैरसमज करून घेवू नये. येथील मंदिरातील त्रिकाल संध्या व आदी सर्व पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी म्हणून हरिकेश राहतेकर यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी माहिती कर्दमाश्रम दत्त देवस्थान समितीने दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button