Maharashtra

शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी खरीप पीक आणि डाळिंब, सीताफळ प‍िकांचा विमा अधिकाधिक प्रमाणात काढावा. खरीप पिकांचा विमा भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै तर डाळिंब, सीताफळ फळ पिकांची विमा उतरवण्याची 14 जुलै तारीख आहे.

शेतकऱ्यांनी हा विमा अधिकाधिक काढावा यासाठी जिल्ह्यातील सीएससी रात्री 10 पर्यंत उघडे राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. तसेच विमा संदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 2660 700 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय पीक विमा आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिगंबर महाडिक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे जनार्दन जंजाळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी डी.आर. भडीकर, एच.डी.एफ.सी.इर्गोचे हरीओम सोळंकी, रामनाथ भिंगारे, बी.एम.जोशी आदींची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button