Pandharpur

लोकनेते आमदार भारतनानांचे कार्य दिलीपबापू धोत्रे पुढे नेत आहेत : माजी नगरसेवक महंमद वस्ताद

लोकनेते आमदार भारतनानांचे कार्य दिलीपबापू धोत्रे पुढे नेत आहेत : माजी नगरसेवक महंमद वस्ताद

मनसेच्यावतीने आमदार भारतनाना भालके यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर लोकनेते आमदार भारतनाना भालके यांची जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न भोजन व साड्या,कपडे वाटप करण्यात आले.याप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक महंमद वस्ताद म्हणाले की
लोकनेते आमदार भारतनानांनी शेवट पर्यंत गोरगरीब जनतेसाठी काम केले. हेच काम दिलीपबापू धोत्रे हे पुढे नेत असल्याचे सांगितले आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे,राष्ट्रवादीच्या नेत्या डाॅ. प्रणिताताई भालके,कोळी समाजाचे नेते अरुणभाऊ कोळी,मा.नगरसेवक धनंजय कोताळकर, महंमद वस्ताद, नगसेवक अक्षय गंगेकर,राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे,संदिप मांडवे,जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष सुळे,धनगर समाजाचे नेते शालिवाहन कोळेकर,मनसेचे तालूका अध्यक्ष शशिकांत पाटील, महादेव मांढरे,मनसे उद्योग सेलचे जयवंतराव भोसले,मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे,महेश पवार, शुभम काकडे, तेजश गांजळे, अवधूत गडकरी, सुरज देवकर, नागेश इंगवले,सुरज गंगेकर आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button