Latur

जिद्द एका शिक्षिकेची……!

जिद्द एका शिक्षिकेची……!

जीवन नदी प्रमाणे कधी खळखळ, कधी उथळ ,कधी डोंगर कपारी दगडावरुन वाहणार ,प्रेम माया, मोह भावनेला घेऊन चलणार.जगणं संघर्षाच!मातृत्वाला जपणार .

अशाच एका मातेची जिद्दीची कहाणी .एका ग्रामीण भागात जन्मास आलेल्या जीवनाच्या संघर्षाची कहाणी.

एक छोटस गाव. नाव इस्थळ या गावाच्या नावाचा पण इतिहास आहे.या गावात एक महादेवाच मंदिर. ज्याला वीस मजले आहेत म्हणून गावाच नाव इस्थळ ,माजी खासदार बाबूसाहेब काळजाते यांच हे गाव ,मांजरा नदीच्या तिरावर वसलेल सुंदर हिरवकंच गाव ,या गावात लालपरी (बस) येण्यासाठी बराच कालखंड केला.काळीभोर जमीन हिरवागार शिवार ,शेती हाच मुख्य व्यावसाय ,जेम तेम हजार लोकसंख्या असेल या गावची.

याच गावात खालच्या आळीत म्हणजे गावकुसाबाहेरील वस्ती म्हणू ,जी आज ही ग्रामीण भागात दिसत आहे ,ठरावीक जात समुह गावाबाहेर वस्ती करुन राहतो त्याला मांगवाडा ,महारवाडा म्हणतात.शहरी भागात अशी वस्ती आढळून येत नाही .पण ग्रामीण भागात आजही समाज व्यवस्था बदलली नाही हे विदारक वास्तव आहे.महारवाड्यात एक जोडप राहत होत अतिशय कष्टाळू आणि स्वाभिमानी.दगडू गजेशिव आणि राजूबाई.यांना तीन कन्या होत्या भिमा ,मालन ,अन् सुलन
सुलन म्हणजे सुलोचना सर्वात लहान मुलगी .उंच गोरा वर्ण ,सडपातळ बांधा दिसाय देखणी ! ही लहान मुलगी खूप जिद्दी आणि धाडसी होती .हे गुण सुलोचनाच्या आई वडीलाने हेरले होते .त्या काळात मुलीना शिक्षण देणे परंपराच नव्हती .आपल्या घरातील हा मुलगाच म्हणून तीला शिकवण्याचा निर्णय आई वडीलांनी घेतला .
गावात चौथी पर्यत शाळा पुढील शिक्षणासाठी जवळच्या बनसारोळा या गावाला पायी जाऊन शिक्षण घ्यावे लागत असे .गावातील दोन चारच मुली शाळेला जात होत्या .त्यातील एक सुलोचना ,नदी नाले पार करत उन्ह पाऊस झेलत शाळेची वाट धरायची .आई वडील दुसऱ्या च्या शेतात दिवसभर मजुरी करुन प्रपंच चालवायची ,सुलोचनाचे वडील सुतारकी पण करायचे ,गावाची येस्कर म्हणून देखील काम केल होत . आपल छोटस पांढऱ्या मातीच घर समोर अंगाणात भल मोठ लिंबाच झाड ,चुलवण ,बाहेर अंगणात मातीच्या वीटात लेपलेला पाणीसाठवणीसाठी रांजन .सुंदर आणि अतिशय स्वच्छ घर .घरातील मातीच परवर मऊ आणि गुळगुळीत आजची स्टाईल फरशी देखील फिकी पडेल! घरात नेहमीच माणसांची वरदळ असे.सुलोचनाचे वडील वारकरी संप्रदायचे म्हणून विचार परिवर्तन वादी होती .मुलीन मोठ व्हाव खूप शिकाव ही इच्छा आई वडीलांची होती.
परगावी पायी जाऊन सुलोचनाने दहावी पर्यत शिक्षण पूर्ण केले ,महारवड्यातील ही पहिलीच मुलगी 10 वी पर्यत शिक्षण घेतलेली !पुढील शिक्षणासाठी आता कुठे जावे म्हणून प्रश्न भेडसावत होता .

म्हणतात ना ओढ असेल तर मार्ग मिळतोच याच प्रमाणे गावातील केशरकाकू काळजाते औरंगाबाद येथे होती .सहज गावात आल्यावर दगडूने मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न छेडला .त्यावर क्षणाचा ही विलंब न लावला काकू म्हणाल्या,” दगडू मुलीला पदवी शिक्षणासाठी औरंगाबाद येथिल मिलिंद कॉलेजात घाल “पोरीच कल्यान होईल !

झाले तर एक खेड्यातील मुलीचा प्रवास शहराकडे निघाला होता.अनोख जग ! एक स्टो अन् ,खाण्यापीण्यासाठी सामान अंगावर एक साडी.औरंगाबाद जाण्यासाठी तयारी .औरंगाबाद ला जाण्यासाठी नदी पार करु पायी जाऊन घारगाव गावातून बस पकडावी लागत असे .गाडी ची वाट पहात कित्येक तास बसावे लागत होते .सर्व सामान हा लवाजमा निघाला .नदीतून जाताना कंबरे येवडे पाणी सर्व कपडे ओलो होत असत ,घारगावाला जाऊ पर्यत अंगावरचे कपडे वाळत होते.
सुलोचनाचा हा प्रवास अनोख जग पाहण्याचा ,घर सोडून एकटीने राहन त्या काळात मुलीच मोठ्ठ धाडसच होत.तालुक्याच्या ठिकाणावरुन औरंगाबाद बस पकडली आणि शिकण्याचा प्रवास सुरु झाला .विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले मिलिंद कॉलेज मधे सलोचनाचे पाऊल पडले .पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी परिस्थितीला तोंड देत दिवस काढले ,10 रु शिष्यवृत्ती मिळत होती त्यातच पूर्ण महिना काढावा लागत असे .लहान सहान चळवळीत साहभाग सुलोचना घेऊ लागली एक गाव एक पाणवठा मधे सक्रीय झाली .ग्रामीण भागात आल्या मुळे सुलोचनाला चुकल्या सारखे वाटत असे .वेगळी फॕशन करुन आलेल्या मुली ,पाहून मन् सुन्न होत असे .सुलोचनाचे राहणीमान साधे ,खांद्यावरचा पदर कधी पडू न देणे .त्यात शेतमजूराच लेकरु परिस्थिती हालाकीची ,त्या वेळ तंत्रज्ञान येवढ विकसीत नव्हत.संदेश वहणासाठी तार आणि पत्र , हेच माध्यम .कोसो दूर गेलेल लेकरु एकट राहत होत फक्त एक जिद्द होती शिकण्यासाठी .त्यात मुलगी म्हणून अनेक त्रास पण सहन करावे लागले .तरी ही पोर डगमगली नही.शिक्षणा पासून विचलित झाली नाही.गावता आल्याव आपल्या समाजाला घेऊन गावत पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.

आता वयात आलेल्या पोरी साठी आई वडील काळजी करत होते .शिकलेला मुलगा मिळावा म्हणून आई वडील काळजीत होते .सुट्टीला आल्यावर एका पोलीस वाल्याची नजर सलोचनावर पडली ,”अरे मुलगी चांगली आहे आणि शिकलेली ,माझ्या सैनिक असलेल्या भावाला शोभून दिसेल ” म्हणून या पोलीस काकानी दगडू कडे आपल्या सैनिक भावासाठी मागणी घातली.मुगला शिकलेला आहे आणि सरकारी नोकर काय हरकत आहे खूप दूरचा असला तरी आपल्या सुलोचनासाठी हे स्थळ चांगलच आहे की ! असे सूर आई वडीलांचे निघत होते .लग्नाची तयारी झाली एकही रुपया हुंडा न घेता मुलाने दोन्ही अंगाने उजवून घेतले लग्न पार पडले , सुलोचना आता सुलोचना महादेव जावळे झाली होती .सैनिक पतीचा सुलोचनाचा अभिमान वाटत असे .दिवस जात होते ,सैनिकाला आपल्या पत्नीला सीमेवर घेऊन जाता येत नसे .म्हणून सुलोचना आपल्या गावी आई वडीलाकडे राहत होती .शिक्षण बंद केले नाही एक मुलगा आणि मुलगी पण झाली.मुला मुलीला घेऊन डि.एड शिक्षण शास्त्र अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर शिक्षिका म्हणून एका संस्थेत नोकरी पण केली .त्या शिक्षण संस्थेच वैशिष्ट्य तिथे महिला शिक्षिका घेतली जात नसे .सुलोचना ही पहिली महिला जी या संस्थेत शिक्षिका म्हणून काम केलेली .त्यानंतर आपल्या मुलांचे शिक्षण संगोपण खेड्यात होणार नाही म्हणून नोकरीवर लाथ मारली आणि शहर जवळ केले .आपले आई वडील लेकर घेऊन नोकरीचा मार्ग काढत राहिली त्यात बहिण मालन व तीचा पती यांनी मदत केली ,एक दिवस सरकारी पत्र आले .जिल्हा परिषद लातूर कडून ,शिक्षिका या पदासाठी आपली नेमणूक मोगरगा तालुका औसा जिल्हा परिषद शाळेत केली आहे तात्काळ आपण रुजू व्हावे.

आनंदी आनंद सर्व पाहूणे रावळे आनंदी आई वडीलांच तर स्वप्न पूर्ण झाले त्यांच लेकरु शिक्षिका झाले होते. एक सुलोचना शिकली अन् त्या माघे शिक्षणाची माळच तयार झाली बहिणीचे लेकरे शिकू लागले .

हा प्रवास सुलोचनाचा येथेच थांबला नाही. पती सीमेवर असताना आपल्या आई वडीलांना सोबत घेऊन एकटी संसाराचा गाडा चालवत होती.
मुल आता मोठी होत होती जिद्दीने आपल्या मुलीला शिक्षिका अन् मुलाला डॉक्टर बनवले .सोप नसत उच्चशिक्षित करण ,ते आव्हान या माऊलीने पेलले होते.मुलीला शिक्षण देऊन शिक्षिका बनवले लग्न करुन दिले .आणि मुलाला डॉक्टर बनवले आता आकाश ठेंकणे वाटत होते .सर्व मिळाले जीवन सार्थ झाले असे वाटू लागले .मुलाने देखिल आपल छोट हॉस्पिटल उभा केले होते .तो रुग्नाची सेवा मनोमन करत होता .शिक्षिका म्हणून सेवा करत असताना मुख्याघ्यापक म्हणून देखील काम केले ,आलेले प्रत्येक आव्हान झेलत प्रवास चालू होता .याच काळात आपली सावली सारखी आई आणि वडील जाण्याचे दुःख पण पेलले होते.ती खचली नाही जीवन प्रवास चालूच होता .आता सरकारी नोकरी म्हणून सेवानिवृत्त झाली होती. तरी ती थांबली नाही आपल्या सैनिक पतीची सरकारी जमीन ताब्यात घेऊन ती जमिन हिरवीकंच केली . 6ते 7 प्रवास करुन जमीन वाहीत केली .खडकावर हिरवी बाग केली .कोण मला आडवीते मी खडकातून ही जन्म घेते .

हा जिद्दीचा प्रवास चालूच होता दोन हजार वीस हे साल
उगवले .अन् ! कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार उठला ,संपूर्ण देश लॉकडाऊन झाडा ,जाण्या येण्यावर बंदी झाली .ती माऊली आपल्या शेतातच आडकली ,आपल्या लेकरासाठी तिचा जीव कासावीत होत होता .
अचानक आपल्या डॉक्टर मुलाचा फोन येतो ,”आई मला अस्वस्थ होतय मी लातूरला निघालो दवाखान्यात दाखवून येतो ,माऊलीची काळजी वाढतच होती ,पंख लाऊन उडत याव की काय ! जिद्द आता हतबल झाली होती .काळजीने मुलीला फोन केला ,मुलाचा संपर्क होत नव्हता . काय झाले असेल ? दवाखान्यात गेल्यावर त्याचा फोन नाही.ज्या डॉक्टर कडे आपला मुलगा गेला आहे त्याच्याशी संपूर्ण केला त्यांनी सांगितले ,”काळजी करु नका ट्रिटमेंट चालू आहे ,कसे ही करुन तुम्ही लवकर या ” असा संदेश ऐकून हतबल झालेली माऊली आपल्या मुलीला फोन करते,”आहे त्या स्थितीत ती लातूरला निघ ,अनिलला का झाले कळेना .

लगबगीने मुलीने लातूर गाठले तर समोर आपला भाऊ मृत अवस्थेत आढळून आला.आभाळ कोसळले होती .दाही दिशा सुन्न झाल्या होत्या. काय झाले माझ्या भावाला डॉक्टर म्हणाले ,”आम्ही खूप प्रयत्न केला आपल्या भावाच्या हृदयाने साथ दिली नाही “.आता या माऊलीला निरोप तरी काय द्यावा ? डोक चालत नव्हतं , वार्याचे पंख घेऊन आई तू निघून ये ! लेकीचे फोन द्वारे संदेश दिला .छोट्या स्कूटर वर ही माऊली आपल्या धाकट्या मुलाला घेऊन गेवराईते लातूर प्रवास अगदी चार तासात पूर्ण केला .आपल लेकरु पाहण्यासाठी डोळे आतूरले होते ,पुढे निःशब्द पडलेला मुलाचा देह .दुःख वेदनेचा महापूरच जणू .तिची जिद्द आता शमली होती…! जीवन प्रवास मात्र चालू होता. जिद्द जगण्याची न थकण्याची …!

अनिता जावळे- वाघमारे
मु.पो,मुरुड ता,जि.लातूर
मो .नं,9545050292

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button