Nandurbar

2021 च्या जनगणनेत स्वतंत्र आदिवासी कॉलम मांगणीसाठी आदिवासी एकता परिषदेचा “उलगुलान”

2021 च्या जनगणनेत स्वतंत्र आदिवासी कॉलम मांगणीसाठी आदिवासी एकता परिषदेचा “उलगुलान”

नंदुरबार : आदिवासी एकता परिषद आयोजित भोंगरा गावात 2021 च्या जनगणनेमध्ये स्वतंत्र आदिवासी कॉलम मांगणी आणि लोकांना जनगणना विषयी मार्गदर्शन केले.
आदिवासी समाज निसर्ग पूजक आहे. आदिवासी देव म्हणून निसर्गातील विविध घटक असतात. आदिवासी संस्कृती मध्ये निसर्गाला मोठा मान असून निसर्ग नियम जीवनात संस्कृतीत जपले जातात. ज्यात प्रेम विश्वास, श्रम, समूह, सहकार्य आणि समता अशी मानवी जिवनमुल्य आहेत. पर्यावरण जतन संवर्धन आहे. मात्र दिवसेंदिवस अनेक धार्मिक प्रवाह आदिवासी समाजाला कोणी वालीच नाही असे समजून आपापल्या धर्मात खेचत आदिवासी अस्तित्व नष्ट करित आहे. राजकीय पक्षांनी देखील आदिवासीला राजकारणा पुरतेच वस्तू प्रमाणे वापर करतांना दिसतात. त्यामूळे भारतातील सर्व आदिवासी एकता करून आवाज उठवूया. सर्वानी एक होवून लढले पाहिजे. पुर्वी जनगनणा कॉलम मध्ये एबोरीजन, अनिमिस्ट, ट्रायबल अशी ओळख होती मात्र स्वतंत्र्यानंतर 1951 पासून ही ओळख संपवण्याच्या जोरदार षडयंत्र सुरू झाल्याचे दिसुन येते. म्हणूण आपल्या अस्तित्त्वासाठी आदिवासींनी जागृत झाले पाहिजे. लढले पाहिजे. असे भोंगरा येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यानी आपले विचार मांडले. या प्रसंगी जेष्ठ विचारवंत आप. वाहरू सोनवणे तथा आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष आप दामू ठाकरे, चंद्रसिंग बर्डे, मोतिराम दादा, सुभाष गंगाराम राहसे अनिल चौहान आणि संतोष पावरा, ठगीबाई, सरपंच विवेक पावरा, ग्रामसेवक सुनिल पावरा ग्रामस्थ आणि इतर गावातील लोक ही उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button