Amalner

नैराश्यातून नंदगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या..

नैराश्यातून नंदगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या..

अमळनेर येथील नंदगाव गावातील रहिवासी नरेंद्र हिरामण पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नरेंद्र 40 वर्ष वयाचे असून घरात आई पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

नरेंद्र ची आई दोन दिवसांपासून बाहेरगावी गेलेली होती. तर पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी गेलेली आहे.कदाचित कौटूंबिक वाद यामुळे नैराश्य येऊन शुक्रवारी राहत्या घरी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही गोष्ट शेजारील किशोर पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच नरेंद्रच्या सावत्र भावाला सांगितले. तात्काळ अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता नरेंद्रला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली आहे. तपास सुनील पाटील हे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button