Dewala

देवळा येथील कलाशिक्षक भारत पवार यांच्या फलकलेखनाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड,ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक रेकॉर्ड,OMG बुक ऑफ रेकॉर्डध्ये निवड

देवळा येथील कलाशिक्षक भारत पवार यांच्या फलकलेखनाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड,ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक रेकॉर्ड,OMG बुक ऑफ रेकॉर्डध्ये निवड
सुशिल कुवर कळवण
देवळा : देवळा येथील कलाशिक्षक भारत रंगनाथ पवार यांनी सर्वाधिक एक हजार एक वेळा रंगीत खडूने केलेल्या फलक लेखनाची राष्ट्रीय विक्रम म्हणून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली .तसेच OMG बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नॅशनल रेकॉर्ड, आणि ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये इंडियन रेकॉर्ड म्हणून नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित कन्या विद्यालय देवळा येथील कलाशिक्षक भारत पवार यांनी सन २००७ पासून आजवर १००१ वेळा बेधक व उद्बोधक फलकलेखनातून रंगीत खडूच्या माध्यमातून चित्र संदेश त्यांनी प्रदर्शित केले आहेत.राष्ट्रीय दिन , आंतरराष्ट्रीय दिन , सांस्कृतिक घटना , जयंती पुण्यतिथीदिन अशा प्रसंगी हे चित्र तसेच अक्षर लेखन भरत पवार सर शाळेच्या दर्शनी फलकावर करत असतात या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फलक लेखन यामुळे समाज प्रबोधन झाले आहे.
त्याचबरोबर भारत पवार हे फलकलेखन प्रात्यक्षिके व्याख्याने पी.डी.एफ.प्रती या माध्यमातून आपला कलेचा आविष्कार महाराष्ट्रभर संप्रेषित करत असतात.
विविध राज्यस्तरीय फलकलेखन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाने अनेकदा गौरविण्यात आले आहे. निर्वाण फाउंडेशन नॅशनल आयडॉल पुरस्कार , राज्यस्तरीय आदियुबा पुरस्कार , राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज गौरव पुरस्कार . एन . डी . एस . टी . आदर्श शिक्षक पुरस्कार , नवोदय क्रांती परिवार स्मार्ट टिचर पुरस्कार , कलारत्न पुरस्कार , शिक्षणसेना शिक्षणतपस्वी पुरस्कार , गिरणा गौरव , महाराष्ट्र फाउंडेशन उपक्रमशील कलाध्यापक , कोरोना योध्दा , महाराष्ट्र पत्रकार संघ आदर्श शिक्षक आदि विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
विद्यार्थी , शिक्षक आणि नागरिकांमध्ये कलासौंदर्याचे संवेदना त्यांनी जागवली आहे.
या माध्यमातून लोकशिक्षणही विस्तारित केले .
विद्यार्थी आणि समाजासमोर चित्र अक्षरलेखन सुलेखन आकर्षक संदेशलेखन यांची प्रदर्शन भरविलीत निर्मितीसाठी चित्रकला , हस्ताक्षर , रांगोळी यांच्या स्पर्धा आयोजित केल्या कलेतून सौंदर्यसंस्कार , जीवनसंस्कार आणि कला निर्मितीतून उपजीविका करता यावी याचे धडे देत आले आहेत . विद्यार्थ्याबरोबरच समाजामध्ये कलात्म जाणिवा प्रेरणा त्यांनी फलख लेखनातुन केल्या आहेत.
रंगीत खडूच्या माध्यमातून सुजनशील कलाध्यापक म्हणून त्यांनी निर्मिलेल्या कलाकृती चित्रे , छायाचित्रे , संदेशचित्रे सर्वं इलेक्ट्रॉनिक्स समाजमाध्यमातून जगभर पोहचली आणि प्रशंसा पात्र ठरले आहेत .कलाशिक्षक प्राथमिक शिक्षक , कलाकार , होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाकृतीमधून निर्मितीची प्रेरणा मिळाली आहे . पर्यावरण , मराठी भाषा संवर्धन , वाचन संस्कृती , लेक वाचवा , स्वच्छता अभियान , पाणी वाचवा , व्यसनमुक्ती , राष्ट्रभक्ती , मराठी अस्मिता या विषयाच्या जनजागरण मोठी गती मिळाली उच्च कला अध्यापन या प्राचार्य जयप्रकाश जगताप ( लेखक , चित्रकार अभिनव कला महाविद्यालय , पुणे ) यांच्या संदर्भ ग्रंथात फलकलेखन चित्रांचा समावेशही झाला असून त्यांच्या विविध उपक्रमांची विशेष दखल घेऊन त्यांच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र ऑफमध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे.
या विक्रमाची नोंद झाल्याबद्दल
देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर,सचिव गंगाधर शिरसाठ, उपप्राचार्या डॉ. मालती आहेर मॅडम ,शिक्षण उपसंचालक श्री. नितीन उपासनी साहेब,शिक्षण सहाय्यक पुष्पावती पाटील मॅडम,शिक्षणाधिकारी वैशाली वीर मॅडम ,गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी फलके मॅडम,केंद्र प्रमुख रावबा मोरे,मुख्याध्यापिका रंजना मोरे,मुख्याध्यापक दिलीप आहेर पर्यवेक्षक ठोके सर,आहेर सर , प्राद्यापक,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी ,परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button