Ausa

गुढी पाडवा सणावर कोरोनाचे सावट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औसेकरांचा गुढीपाडवा साध्या पध्दतीनेच साजरा

गुढी पाडवा सणावर कोरोनाचे सावट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औसेकरांचा गुढीपाडवा साध्या पध्दतीनेच साजरा

औसा प्रतिनिधी :- प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:- औसा तालुक्यात साध्या पध्दतीने
गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला .गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक यादिवशी नवीन वस्तूची खरेदी करतात .

औसा तालुक्यात मराठी नविन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने आरोग्याच्या हिताची गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यावर्षीचा गुढीपाडवा संचारबंदी लागू केल्यामुळे कुठेही न जाता कुटुंबासमवेत नागरिकांनी साजरा केला. नविन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊ शकत नसल्याने कोरोना संकट टळुन सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशा सदिच्छा एकमेकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून देण्यात आल्या.
कोरोना विषाणूचा पादुर्भाव टाळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवस देश लाॅक डाऊनची घोषणा केली आहे.महाराष्ट्र राज्यात सर्वत्र संचार बंदी लागु केल्याने मराठी नववर्षाची गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी पुजेसाठी लागणारी फुलं, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे सर्व साहित्य शहरी भागासह ग्रामीण भागात तुटवडा आला होता.ग्रामीण भागातील किराणा दुकानातील पुजेसाठी लागणारे साहित्य सकाळीच संपल्याने नागरिकांनी यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या या साहित्याविना गुढी उभारली.

औसा तालुक्याच्या अनेक ठिकाणी आनंदात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला . घरांमध्ये, गुढी उभारून तिला गोड नैवैद्य दाखवण्यात आला . सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवन्यात आली. या दिवशी घरोघरी जात आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन केले जाते. मात्र,यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने सोन्याचे दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या होत्या .कोरोनाचे संकट टळो सर्वांना निरोगी आयुष्य मिळो अशा शुभेच्छा नागरिकांनी घरात बसून एकमेकांना व्हाॅट्सअॅप,फेसबुक,या सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button