Nashik

नाईक महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

नाईक महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा

सुनील घुमरे नाशिक

दिंडोरी : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे प्राचार्य डॉ. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच पत्रकार दिन साजरा करण्यात आला. ०६ जानेवारी १८३२ या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याप्रसंगी दिंडोरी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संतोष कथार व दैनिक सकाळचे प्रतीनिधी रामदास कदम यांनी प्रतींनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करून महाविद्यालयास शुभेछा दिल्या. पत्रकारितेत अनेक पत्रकारांची गौरव शालीपरंपरा असल्याचे अद्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. संजय सानप म्हणाले.
दिंडोरी तालुक्यातील विविध वृत्तपत्रांचे तालुका प्रतींनिधी भगवान गायकवाड, संदीप मोगल, सुखदेव खुर्दळ, बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, सुनील घुमरे, किशोर देशमुख, समाधान पाटील व नितिन गांगुर्डे हे सर्व कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, डॉ. महादेव कांबळे, प्रा. दिलीप कुटे, प्रा. अरविंद केदारे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. धिरज झाल्टे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बोरस्ते यांनी केले. तसेच प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष भैलुमे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button