Amalner

अमळनेर: दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..!सर्व शाळांना देणार भेट..!

दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन..!सर्व शाळांना देणार भेट..!

अमळनेर पोलिस स्टेशन मार्फत नियुक्त केलेले ‘दामिनी’ पथक शाळांना भेट देत आहेत. या पथकाला पाचारण करण्याचा उद्देश म्हणजे शहरातील शाळा आणि काॅलेज परिसरात टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करणं, वाईट प्रकाराला आळा घालणे आणि विद्यार्थिनींना संरक्षण प्रधान करणे. त्या निमित्ताने आज आपल्या स्व सौ पद्ममावती नारायणदास मुंदडा विद्यालयात या पथकाने भेट दिली आणि या पथकातील महिला पो.काॅ. ईशी , पो.काॅ. जरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने सौ. किर्ती सोनार , सौ.वंदना पाटील आणि सौ.स्वाती पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन दामिनी पथकाचा सत्कार केला.विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री.गोकूळ बोरसे यांनी देखील यावेळी मुलांना मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button