Amalner

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण…

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण…

अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता नववी व दहावीतील 45 विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे. प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
लसीकरण बी.एन.ओ श्रीमती के.एल गायकवाड,ए.आर पाटील(एच ए ढेक खु)
आर.एस आहिरे (आरोग्य सेवक), संदीप पाटील (डाटा आँपरेटर), श्रीमती उज्वला पाटील(आशा स्वयंमसेविका देवळी)यांनी केले.
लसीकरण झाल्यानंतर त्यांचा सत्कार शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन ,ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एच.ओ माळी, एन .जी देशमुख यांनी केला. लसीकरण यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button