Indapur

?️ कोरोनाचे दहशतीचे बळी…अपघातात दोन जण ठार

कोरोनाचे दहशतीचे बळी दोन जण ठार

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोंढे वस्ती नजीक मोटार आणि स्कुटी चा भीषण अपघात.
अपघातात दोन जण ठार.
एक लहान मुलगी गंभीर जखमी.
झाला आहे कोरोणाच्या धास्तीने पुणे आणि मुंबई वरून आपल्या गावी जाण्यासाठी नागरिक मिळेल त्या वाहनाने तसेच पायी जाण्यासाठी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत. रविवारी दोन दुचाकी वरून पुण्याहून आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले होते .

दरम्यान तहान लागल्याने सर्वजण महामार्गाच्या खाली उभे राहून पाणी पीत होते. तेवढ्यात पुणे दिशेने होऊन मोटार (क्र. एम एच ०४ एचएम १५२८) भरधाव वेगात सोलापूर दिशेला जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारसायकलला कट मारून त्या मोटर सायकल पुढे उभे राहिलेले दयानंद दुपारगुडे आणि त्यांची पत्नी सुवर्णा दुपारगुडे यांना मोटारीने जोरदार धडक दिली .

धडक इतकी भीषण होती की हे दोघेही मोटारीखाली येऊन फरफटत पुढे गेले. या अपघातात सुवर्णा दुपारगुडे यांचा जागीच मृत्यू झाला ,तर त्यांचे पती दयानंद दुपारगुडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना एका खाजगी वाहनातून इंदापूर येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसेच त्यांच्यासोबत असणारी त्यांची नात वेदिका दुपारगुडे हिच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून तिच्यावर इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील कारने सायंकाळी ६.५० मिनिटाच्या सुमारास अचानक पेट घेताला इंदापुर नगर पालेकेच्या अग्निशामक बंबाने हि आग विझवण्यात आली त्या वेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे निरिक्षक मुटेकर साहेब नाथा गळवे नगरपालिका कर्मचारी मोहन शिंदे सुर्यकांत भंडारी संतोष सुर्यवंशी होमगार्ड अे आर मुलाणी एम आर बनसोडे व डॉ शाहरुख पठाण त्या ठिकाणी उपस्थित होते.
मयत दुपारगुडे यांचे पुतणे वैभव दुपारगुडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास ठाणे अंमलदार एस एम मड्डी करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button