Ahamdanagar

धर्मनाथबीज किर्तन महोत्सव पारायण सोहळ्याचे आयोजन

धर्मनाथबीज किर्तन महोत्सव पारायण सोहळ्याचे आयोजन

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन घोटण येथे वै.आश्रु गंगाराम निकम यांच्या प्रेरणेने व ह.भ.प.रामहरी महाराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मनाथबीज किर्तन महोत्सव पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हरीजागर, भजन,ग्रंथपुजन, वाचन, प्रवचन, दिंडीप्रदक्षिणा अन्नदान ई. कार्यक्रम पार पडले.

व्यासपीठ ह.भ.प.महादेव महाराज घुगे यांनी चालवले.ह.भ.प. स्वप्नील पवार, कल्याण सावळे,महेश हरवणे,यांची किर्तने तर ,ह.भ.प. सोमेश्वर क्षिरसागर, एकनाथ शिंदे, दत्तात्रय कुलट,यांची प्रवचणे झाली.ह.भ.प. रामदास महाराज खेडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या महोत्सवाची सांगता झाली. अशोक निकम,चंद्रभान निकम,मारुती निकम यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत देण्यात आली.या सोहळ्यासाठी गणेश निकम,बापु निकम, राजू निकम, दामूआण्णा घुगे,भारत निकम,दत्तात्रय निकम,खंडू निकम,महादेव निकम,संतोष निकम, आजिनाथ निकम,यांनी विशेष सहकार्य केले. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button